भंडारा जिल्ह्यात टँकरखाली चिरडून दोन महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:55 IST2019-06-27T13:54:45+5:302019-06-27T13:55:13+5:30
भरधाव टँकरखाली चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजरूक येथे घडली.

भंडारा जिल्ह्यात टँकरखाली चिरडून दोन महिला ठार
ठळक मुद्देतुमसर तालुक्याच्या डोंगरी बु. येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव टँकरखाली चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजरूक येथे घडली. या दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या.
वंदना हिरामण सोनेकर (31) आणि सुनीता जीवन चौधरी (44) रा. डोंगरी बु. अशी मृत महिलांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी त्या दोघी खाणीतील काम आटपून दुचाकीने डोंगरी बुजरूक या गावाकडे जात होत्या. त्या वेळी समोरून आलेल्या मॉयल कंपनीच्या पाणी टँकरने धडक दिली. त्यात या दोघीही टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या.