शेतकरीपुत्रांनी साकारला दुचाकीवरील मोटरपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:28 IST2017-08-05T23:28:11+5:302017-08-05T23:28:34+5:30
आॅगस्ट महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. जून, जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले.

शेतकरीपुत्रांनी साकारला दुचाकीवरील मोटरपंप
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आॅगस्ट महिना सुरू झाला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. जून, जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. दोनदा पेरणी केल्यानंतरही पावसाने दगा दिल्यामुळे पºहे करपले आहेत. दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पिकांना जगविण्यासाठी पाच शेतकºयांच्या मुलांनी एकत्र येऊन दुचाकीवर मोटरपंप तयार केला आहे. या मोटरपंपाच्या सहाय्याने शेतीला पाण्याची सुविधा केली आहे. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकºयांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरणारा आहे.
भंडारानजिकच्या खोकरला या गावातील मंगेश श्रीराम ढेंगे, मनोहर श्रीराम धांडे, खुशाल उरकुडा मते, रूपेश राजू कडव, आशिक कुसन बांते रा.खोकरला ही पाचही मुले शेतकºयांची आहेत. मंगेश हा १२ वी तर मनोहर व खुशाल हे दोघेही नववा वर्ग उत्तीर्ण आहे.
रूपेश हा सातवी तर आशिक हा पदवीधर असून त्याने आयटीआयचे तांत्रिक शिक्षण पूर्ण केले आहे. शेतकºयांना पिकांसाठी पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने दुचाकीच्या सहाय्याने मोटरपंप चालू शकतो, अशी संकल्पना या तरूणांच्या डोक्यात आली व त्याला मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली.
सदर पंप तयार करण्यासाठी ३ अश्वशक्ती पंपाचा आकार असलेला एक लोखंडी ढाचा, पंपाच्या आतमध्ये असलेला एक पंखा, व पंख्याला फिरविणाºया पंपाचे रॉडला दाते असलेला एक व्हील वेल्डींग करण्यात आला.
या पंपाला ३ इंचाचे पाईप लावून त्या पाईपला शेवटच्या टोकाला एक फुटबॉल लावण्यात आला. त्यानंतर सदर पंप हा दुचाकीच्या डाव्या बाजुच्या फुटस्टँडच्या ठिकाणी एक लोखंडी स्टँड लावून त्यावर सदर पंप फिट करण्यात आले. दुचाकीच्या मागच्या शॉकअप लगत दुचाकीची चैन लहान करून तिला व्हीलवर टाकण्यात आली. त्यानंतर ज्या ठिकाणाहून पाणी ओढावयाचे आहे अशा विहीर,नाला, नदी किंवा तलाव परिसरात दुचाकी उभी करण्यात येते.
दुचाकीला पहिल्या गिअरमध्ये घेतली जाते. त्यानंतर लगेच दुसºया व तिसºया गिअरमध्ये टाकण्यात येते. यामुळे लगेच फॅनच्या एॅम्पुलरव्दारे कॉम्प्रेसर बनतो. दुचाकीची गती ५० ची ठेवल्याने मोटरपंपातून पाण्याचा प्रवाह सुरू होतो.
सदर पाण्याचा प्रवाह हा ३ इंच अशा पाईपमधून वेगाने बाहेर पडून दिड तासामध्ये एक एकर शेती सिंचित करता येत असल्याचा दावा या युवकांनी केला आहे. अर्धा तास दुचाकी बंद करून पुन्हा सुरू करून पाण्यासाठी सदर पंपाचा उपयोग करता येऊ शकते.
यासाठी एक लिटर पेट्रोल लागत असून कुठल्याही ठिकाणी सदर दुचाकीच्या सहाय्याने चालणारा हा पंप नेआण करण्यासाठी सोयीचे आहे. यापासून दुचाकीच्या इंजिनचे कोणतेही नुकसान नसल्याचे या तरूणांनी यावेळी बोलताना सांगितले.