उभ्या ट्रकवर आदळली दुचाकी; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST2021-03-08T04:32:49+5:302021-03-08T04:32:49+5:30

तुमसर : नजीकच्या खापा चौकात रिजवी पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ...

A two-wheeler colliding with a vertical truck; One killed | उभ्या ट्रकवर आदळली दुचाकी; एक ठार

उभ्या ट्रकवर आदळली दुचाकी; एक ठार

तुमसर : नजीकच्या खापा चौकात रिजवी पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

प्रकाश उपासराव शेंडे (२५, रा.चिखला, ह.मु.डोंगरगाव) असे ठार झालेल्या इसमाचे नाव असून, दीपक सुखदेव मेहर (२५, रा. डोंगरगाव), लक्ष्मण घनश्याम चाचिरे (२५, रा. डोंगरगाव) अशी जखमींची नावे आहेत.

तुमसर येथील कार्यक्रम आटोपून प्रकाश शेंडे हा दीपक मेहर, लक्ष्मण चाचिरे याच्यासह दुचाकीवरून ट्रीपल सीट डोगरगावकडे जात होते. खापा चौकात आल्यानंतर प्रकाशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. धडक इतकी जबर होती की प्रकाश जागीच ठार झाला, तर दीपक व लक्ष्मण हे थोडक्यात बचावले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुमसर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, पोलीस हवालदार धायगुण करीत आहेत.

Web Title: A two-wheeler colliding with a vertical truck; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.