लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: दोन ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या दांडेगावजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. साकोली मार्गाकडून धानाची पोती घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रक (क्रमांक एम एच ३६ एफ १८५१ ) व लाखांदूर कडून साकोली मार्गाकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक टी. एन.५२ एच. ३४९४ ) या दोन्ही ट्रक मध्ये साकोली ते लाखांदूर महामार्गावरील दांडेगाव नजीकच्या जंगल परिसरात समोरसमोर धडक झाली. चालक मोंटू पुरुषोत्तम भुते (२५) रा. लाखांदूर व लक्ष्मणनंद पांचाम चिन्नपल्लम (४०) रा. कावेरी चेटीपट्टी,ता. सिबुगिरी, जि. शेलम, तामिळनाडू अशी मृतांची नावे आहेत . या अपघातात दोन्ही ट्रक समोरासमोर एकमेकांत घुसले असल्याने मृतदेह काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तपास एपीआय गावंडे दिघोरी हे करीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात दांडेगावजवळ दोन ट्रकची भीषण टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:17 IST
दोन ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या दांडेगावजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
भंडारा जिल्ह्यात दांडेगावजवळ दोन ट्रकची भीषण टक्कर
ठळक मुद्देदोन्ही चालक जागीच ठार