जिल्ह्यात दोन पाॅझिटिव्ह, एक कोरोनामुक्त, मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:31+5:302021-07-09T04:23:31+5:30

गुरुवारी ६५२ व्यक्तींची चाचणी केली असता, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला. भंडारा, मोहाडी, तुमसर, ...

Two positive, one corona-free, no death in the district | जिल्ह्यात दोन पाॅझिटिव्ह, एक कोरोनामुक्त, मृत्यू नाही

जिल्ह्यात दोन पाॅझिटिव्ह, एक कोरोनामुक्त, मृत्यू नाही

गुरुवारी ६५२ व्यक्तींची चाचणी केली असता, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला. भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी आणि लाखांदूर तालुक्यात रुग्णांची नोंद झाली नाही. एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला. गत काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. मात्र कोविड पोर्टल अद्ययावत झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूची संख्या एकने वाढली आहे. आता जिल्ह्यात ११३० बळी झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख २१ हजार ९०८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४५१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ५८ हजार ३४४ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा, तुमसर येथे प्रत्येकी ३, लाखनी, साकोली येथे प्रत्येकी ४, पवनी २ आणि लाखांदूर येथे १ ॲक्टिव्ह रुग्ण आहे.

Web Title: Two positive, one corona-free, no death in the district