पाण्याची जुनी टाकी तोडताना दुर्घटना; दोन मजूर गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 16:20 IST2019-05-28T16:19:00+5:302019-05-28T16:20:25+5:30
स्लॅबसह दोन मजूर उंचावरुन कोसळले

पाण्याची जुनी टाकी तोडताना दुर्घटना; दोन मजूर गंभीर
भंडारा : पाणी पुरवठा योजनेची जुनी टाकी तोडताना स्लॅबसह खाली कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता घडली.
पाणीपुरवठा योजनेची जुनी टाकी जीर्ण झाल्याने ती मंगळवारी तोडण्यात येत होती. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत प्रमोद मडावी (२७), अजय लोखंडे (२५) दोघे रा. पिंपळगाव कोहळी जखमी झाले. प्रमोद व अजय ड्रिल मशीनने टाकीचा स्लॅब तोडत होते. अचानक स्लॅबसह दोघेही उंचावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही लाखांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.