अतिवृष्टीत दोन घरे कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:57 IST2019-08-10T00:57:19+5:302019-08-10T00:57:46+5:30
पवनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत अड्याळ येथील दोन घरे गुरूवारी सायंकाळी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबांना मात्र उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

अतिवृष्टीत दोन घरे कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत अड्याळ येथील दोन घरे गुरूवारी सायंकाळी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबांना मात्र उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
अड्याळ येथील वसंत धोंडू शिवणकर यांचे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये घर आहे. गुरूवारी सायंकाळी अतिवृष्टीमुळे अचानक घर कोसळले. सुदैवाने अचानक त्या घरात कुणीही नव्हते. घर पडल्याने घरातील सर्व जीवनावश्यक वस्तुंची हानी झाली. त्यानंतर नागोराव मोतीराम मेश्राम यांचे वॉर्ड क्रमांक ३ मधील घरही कोसळले. घरातील संपूर्ण साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. विशेष म्हणजे २ आॅगस्टपासून अड्याळमध्ये आठ घरांची पडझड झाली आहे.