बिबट्याने फस्त केल्या दोन शेळ्या
By Admin | Updated: August 12, 2016 00:26 IST2016-08-12T00:26:35+5:302016-08-12T00:26:35+5:30
पावसाळा असल्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांना मुबलक चारा उपलब्ध असल्यामुळे ....

बिबट्याने फस्त केल्या दोन शेळ्या
वडेगाव येथील घटना : बंदोबस्त करण्याची मागणी
साकोली : पावसाळा असल्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांना मुबलक चारा उपलब्ध असल्यामुळे वन्यप्राणी वाघ व बिबट्यांना दिसेनासे झाले. परिणामी बिबट्यांची धाव आता शेतशिवाराकडे वाढल्याने गावातील शेळ्या, कोंंबड्या व कुत्र्याची शिकार करणे सुरू आहे. त्यामुळे जंगलाशेजारी असलेल्या गावात सध्या बिबट्याची दहशत कायम आहे. वडेगाव खांबा येथे गजानन चोपकर व रामजी भोडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. या घटनेची तक्रार वनविभागाला देण्यात आली आहे. वनविभागाने घटनास्थळावर येवून पंचनामा केला आहे. सध्या तालुक्यातील मुंडीपार सडक, बरडकिन्ही, किटाळी, गिरोला, घानोड, आमगाव, वडेगाव खांबा या गावात बिबट्याची दहशत असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. (तालुका प्रतिनिधी)
बिबट्याने शेळ्याची शिकार केली. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आधीच शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे व त्यात ही शेळ्याची नुकसान त्यामुळे वनविभागाने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
-हेमराज गहाणे, सरपंच वडेगाव.