जिल्ह्यात दोघांचा मृत्यू १०१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST2021-05-29T04:26:36+5:302021-05-29T04:26:36+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८२ हजार ९२० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५८ हजार ४७७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून ...

Two deaths in the district 101 positive | जिल्ह्यात दोघांचा मृत्यू १०१ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दोघांचा मृत्यू १०१ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८२ हजार ९२० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५८ हजार ४७७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांपैकी ५६ हजार ४५४ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली; तर १०४९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ३५२, मोहाडी ६२, तुमसर ११०, पवनी ७३, लाखनी ८३, साकोली २१७, लाखांदूर ७४ व्यक्तींचा समावेश आहे.

बॉक्स

सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात

कोरोनाने जिल्ह्यात १०४९ जणांचा बळी घेतला असून, त्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात ४८८ आहेत. मोहाडी तालुक्यात ९४, तुमसर ११८, पवनी १०४, लाखनी ९४, साकोली १०२ आणि लाखांदूर तालुक्यातील ४९ जणांचा समावेश आहे. सध्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात असून मृत्युदर १.७९ टक्के आहे.

Web Title: Two deaths in the district 101 positive