दोन दिवसांपासून ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत

By Admin | Updated: August 21, 2014 23:36 IST2014-08-21T23:36:28+5:302014-08-21T23:36:28+5:30

जंगलात जखमी झालेला एक बिबट गावात शिरला. तिथे त्या बिबट्याने एका घराचा आश्रय घेतला. ग्रामस्थ प्रचंड घाबरले. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले.

For two days in the horizontal area, | दोन दिवसांपासून ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत

दोन दिवसांपासून ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत

ढोरप येथील घटना : वनविभागाच्या हातावर तुरी देऊन बिबट्या फरार
पवनी : जंगलात जखमी झालेला एक बिबट गावात शिरला. तिथे त्या बिबट्याने एका घराचा आश्रय घेतला. ग्रामस्थ प्रचंड घाबरले. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वांची नजर चुकवून बिबट्याने जंगलात धूम ठोकली.
पवनी तालुक्यातील ढोरप हे गाव जंगलव्याप्त क्षेत्रात आहे. बुधवारला या गावात बिबट्या आला. त्याने हरी गजभिये यांच्या पडक्या घरात लपून बसला. ही वार्ता गावात पसरली. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनअधिकारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे आणले. पिंजऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, बिबट्या तिथून पळाला. त्यामुळे वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
गावाशेजारी रानटी कुत्रे असल्यामुळे या कुत्र्यानी बिबट्याला जखमी केले असावे, त्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा होत्या, असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. बुधवारला रात्री ८.३० वाजता रवी टेंभुर्णे यांच्या घरात हा जखमी बिबट शिरला होता. कुटूंबियांनी आरडाओरड करताच बिबट्याने तेथून पळ काढला. दुपारी १२ वाजता तो बिबट टेंभुर्णे यांच्या घराकडे पुन्हा आला. लपण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे तो भगवान गजभिये यांच्या पडक्या घरात शिरला. याची माहिती वनअधिकारी गायकवाड यांना देण्यात आली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्यांनी गोंदिया येथून तज्ज्ञांना पाचारण केले. पडक्या घरात लपलेल्या बिबट्याला अंधारामुळे जेरबंद करण्यात अपयश आले.
दरम्यान बघ्यांची गर्दी व आवाजामुळे तो बिबट अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. बेशुद्धीचे इंजेक्शन मारण्यात आले परंतु तो चपळाईने पळून गेला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: For two days in the horizontal area,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.