शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

दोन कोटींची पाणीपुरवठा योजना कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:16 PM

शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ठाणा पेट्रोलपंप येथील पदाधिकारी व सदस्य यांच्या समन्वयांचा अभाव, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, आमदाराचे आश्वासन फेल.

ठळक मुद्देठाणा येथील प्रकार : समितीचे फत्ते, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ठाणा पेट्रोलपंप येथील पदाधिकारी व सदस्य यांच्या समन्वयांचा अभाव, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, आमदाराचे आश्वासन फेल. परिणामी सुमारे दोन कोटीची महत्त्वाकांक्षा पाणीपुरठ्याची योजना कुचकामी ठरत आहे. नियमबाह्य सात लक्षाचे धनादेश संबंध अध्यक्ष सचिवावर ग्रामसभेची मागणीला केराची टोपली.भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे नवीन ठाणा पाणीपुरवठा योजनेकरिता सन २००७-०८ मध्ये, १ कोटी ४६ लक्ष किमतीची महत्वाकांक्षा योजना मंजूर झाली. यापैकी ७२ लक्ष ९२ हजार २६० रुपये ठाणा येथील पाणीपुरवठा करिता देण्यात आले. ६५ लक्ष हे पाण्याच्या स्त्रोताठिकाणी २४ तास विद्युत पुरवठा राहावे यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आपल्याकडे राखून ठेवला. या कामाचे कंत्राट कुणाला द्यावे या बाबतीत सुरुवातीला ग्रामपंचायत व ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमध्ये मताध्येक्य झाले नाही. अखेर डिसेंबर २००८ रोजी निविदानुसार वर्धा येथील मेहेरे कन्स्ट्रक्शनला दीड वर्षात काम पूर्ण करण्याच्या अटीवर काम देण्यात आले. यात ठाणा येथील विवेकानंद कॉलोनी स्थित १० हजार चौरस फुट जागेवर १२ मीटर उंच १ लक्ष ४२ हजार क्षमतेची टाकी निर्माण करणे, रहदारीत ८ हजार १४० मीटर लांबीची १४० एम.एम. ते ७० एम.एम. आकाराचे पीव्हीसी पाईप लाईन टाकण्याचा समावेश होता. रीतसर कामाला २९ जुलै २००९ ला सुरुवात झाली .काम हे कासवगतीने सुरु होते. याकडे संबंधित समिती, पदाधिकारी, अधिकारी यांचे या योजनेकडे दुर्लक्ष होत गेले. मध्यंतरी हे काम महाराष्ट्र शासनाच्या १२ आॅगस्ट व १८ नोव्हेंबर २००९ च्या निर्णयानुसार ग्रामपंचायत सरपंच हे अध्यक्ष व ग्रामविकास अधिकारी हे सचिव राहतील. या प्रकारे फेरबदल करून निर्णय घोषीत केला. त्यानुसार काम सुरु झाले. पुन्हा कोर्टाच्या आदेशाने समितीकडे पदभार सोपविण्यात आले. या दरम्यान संबंधित कंत्राटदाराने काही ठिकाणी मुख्य जलवाहिनी व गावात अपुरे वितरण नलिका टाकण्याचा प्रकार घडला.कॉलोनी येथे कमी पाण्याअभावी चार खांब उभारून पहिला टप्पा म्हणून ३६ लक्ष ९२ हजार ९११ रु. समितीतर्फे देऊ केले नि केले तोच कंत्राटदाराने आपले काम बंद केले. दरम्यान तीन कंत्राटदार या कामी लागले. समिती सदस्य पदाधिकारी यांचे खिसे गरम झाले. मात्र पाईप लाईन द्वारे टाकीत पाणी वितळणे सुरु झाले नाही. कोरंभी नदी पात्रात परत पैसेचे स्वरुपात वापस जाऊ लागले. विभागीय आयुक्ताच्या आदेशाने पैशाचा वर्षाव समितीवर झाला. ही योजना दोन कोटीच्या घरात पोहचली. ७ लाखाचा धनादेश पाणीपुरवठा समितीच्या ठराव व ग्रामपंचायतीची परवानगी पत्र न घेता परस्पर कंत्राटदाराला देऊ केले. या पैशासंबंधी ज्येष्ठ नागरिकांना विचारणा केली असता आम्ही पैसे खाल्ले काय असे उत्तर देत होते. मात्र याविषयी खर्चाचे विवरण सभेपुढे मांडत नव्हते. परिणामी ग्रामसभेने पैशाची अफरातफर प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा ठराव घेत अध्यक्ष सचिवावर योग्य कारवाई करण्याचे प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविण्यात आले. मात्र अधिकाºयांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. मागील वर्षी गणेशपूर ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती भंडाराची आमसभा घेण्यात आली होती. यात वरील मुद्दा सरपंच कल्पना निमकर यांनी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या उपस्थितीत मांडला. दोन महिना ठाणा येथील पाणीपुरवठा सुरु करणार असल्याचे व तसे न झाल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्या आश्वासन एक वर्षात लोटले. मात्र काहीच कारवाई झालेली नाही. परिणामी १० वर्ष लोटून गेले. योजनेची कालमर्यादा संपण्याच्या जवळ येऊन ठेपली. टाकलेली पाईपलाईन निकामी झाली. उपयोग शून्य योजना अखेर कुचकामी ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.