दोन लाचखोर जाळ्यात
By Admin | Updated: December 6, 2014 00:57 IST2014-12-06T00:57:33+5:302014-12-06T00:57:33+5:30
शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन ठिकाणी सापळा रचून दोन लाचखोरांना रंगेहात पकडले.

दोन लाचखोर जाळ्यात
भंडारा : शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन ठिकाणी सापळा रचून दोन लाचखोरांना रंगेहात पकडले. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र तंत्रज्ञ अनिल माधवराव साळवे व भंडारा पोलिस विभागातील पोलिस नायक उमांकात भाऊराव जोगेकर अशी या लाच घेणाऱ्यांची नावे आहेत. साळवे यांनी २५० रुपयांची तर जोगेकर यांनी ५०० रुपयाची लाच मागितली.
भंडारा येथील आनंद नगरातील रहिवासी विशाल वासनिक यांची ३ महिण्यांपूर्वी दुचाकी पकडण्यात आली होती. त्यावेळी ते मद्यप्राशन केले असल्याने त्यांच्यावर १ हजार रुपयांची दंड ही थोटावले होते. मात्र वाहनाचे मुळ कागदपत्र पोलिस कर्मचारी उमाकांत जोगेकर यांच्या अखत्यारीत होते. ते परत देण्यासाठी जोगेकर याने वासनिक यांच्याकडे ५०० रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात वासनिक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. दरम्यान आज सापडा रचून ५०० रुपयांची लाच स्वीकारताना जोगेकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.
सामान्य रुग्णालयातही
लाचखोरांचा शिरकाव
गरिबांसाठी असणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातही आता लाचखोरांचा शिरकाव झाला आहे. नेत्र विभागातील नेत्रचिकित्सक तंत्रज्ञ अनिल साळवे यांनी राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत रुग्णाला चष्मा देण्याकरिता तक्रारदात्याला ५०० रुपयांची लाच मागितली. मात्र सरतेशेवटी २५० रुपयांची लाच घेण्यावर समजोता झाला. २ि५० रुपयांची लाच घेताना साळवे यांना रंगेहात पकडण्यात आले. सन २०१३ मध्ये ग्राम विकास पुर्व माध्यमिक शाळा कोंढी येथे ८ व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या डोळ्यात त्रास उद्भवल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याअंतर्गत तिला चष्मा देण्याचे ठरविले होते. याचे काम साळवे यांच्याकडे असल्याने चष्मा देण्याकरिता त्यांनी लाच मागितली होती. सदर कारवाई पोलिस अधिक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलिस अधिक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)