शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन अस्वलांची शिकार प्रकरण, चार आरोपींना अटक; पाच दिवसांची वन कोठडी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 24, 2024 20:52 IST

अटकेतील आरोपींमध्ये अश्विन देशमुख (३८), मंगेश चचाणे (३५), रूपचंद शेंडे (३२) आणि रमेश रोहणकर (४८) यांचा समावेश आहे. ते सर्वजण नान्होरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.

भंडारा : लाखनी वनपरिक्षेत्रा अंतर्गत सहवनक्षेत्रालगतच्या रामपुरी गावाच्या शेतशिवारात दोन नर अस्वलांचा विजेच्या सापळ्यात अडकल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी चार आरोपींना अटक करून त्यांची वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये अश्विन देशमुख (३८), मंगेश चचाणे (३५), रूपचंद शेंडे (३२) आणि रमेश रोहणकर (४८) यांचा समावेश आहे. ते सर्वजण नान्होरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.

१८ फेब्रुवारीच्या सकाळी या शेतशिवारात दोन अस्वल मृतावस्थेत आढळले होते. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ६ दिवसांपूर्वी रामपुरी येथील शेतशिवारात दोन्ही अस्वलांना विजेचा प्रवाह सोडून ठार केले होते. पूर्ण वाढ झालेले हे अस्वले मागील काही दिवसांपासून या परिसरात फिरत होते. आरोपींनी जंगली डुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात विद्युत तारा टाकून विद्युत प्रवाह लावला. त्यात अडकल्याने दोन्ही अस्वलांचा मृत्यू झाला. लाखनी वनविभागाच्या पथकाने तपास करून २३ फेब्रुवारीला सकाळी चारही जणांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून लाखनी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.

आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यतावनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरलेल्या तारा, खुंटे आदी जप्त करण्यात आले आहेत. अस्वलांचे वजन भरपूर असल्याने केवळ चार व्यक्तींनीच त्यांना उचलून बाजुला ठेवणे शक्य नाही. यावरून, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. नजीकच्या काळात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग