दुचाकीने दारू तस्करी करणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST2021-05-10T04:35:56+5:302021-05-10T04:35:56+5:30

लाखांदूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून देशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही ...

Two arrested for smuggling liquor on a two-wheeler | दुचाकीने दारू तस्करी करणारे दोघे जेरबंद

दुचाकीने दारू तस्करी करणारे दोघे जेरबंद

लाखांदूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून देशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. दोन जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

चंदु जांभुळकर (४२) रा. अर्जुनी, रोषन लोणारे (४०) रा. वडेगाव (रेल्वे) अशी आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत रमली (३२) रा. वडेगाव व देवराज गुनेवार (५०) रा. देवरी जि. गोंदिया अशी पसार झालेल्यांची नावे आहेत.

चौघे जण दुचाकीने लाखांदूर तालुक्यातून गोंदिया जिल्ह्यात देशी दारूची अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुयार गावाजवळ सापळा रचला असता चौघे जण दुचाकीने दारू नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी देशी दारूचे पव्वे व दुचाकी जप्त केली. चारही आरोपींविरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Two arrested for smuggling liquor on a two-wheeler