राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील नाकाडोंगरी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची बोनस रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या खरीप हंगामाची कामे सुरु असल्याने शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता भासत आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना आधीच विविध संकटाचा सामना करावा लागत असताना धान खरेदी केंद्रावरुन बोनसची रक्कम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने तात्काळ बोनसची रक्कम जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.तालुक्यातील विकास सेवा सहकारी संस्था नाकाडोंगरी अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते.सदर धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३५ हजार ७६४ क्विंटल शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले आहे.शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १८१५ प्रती क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली आहे. मात्र खरेदी केलेल्या धानाच्या बोनसची एकुण रक्कम दोन कोटी ५० लाख ३५ हजार ८० शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही.सध्या शेतकऱ्यांचे धान पेरणीचा हंगाम सुरु झाला असून या कालावधीत शेतकऱ्यांना बि बियाणे, खते खरेदीसाठी पैसे तात्काळ जमा करणे गरजेचे आहे. नाकाडोंगरी लगतच्या गर्रा बघेडा, डोंगरी बु., आष्टी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची पूर्ण रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोनसची मागणी जोर धरत आहे.शेतकऱ्यांची व्यथा समजून त्यांना तात्काळ बोनसची रक्कम शासनाने दिली पाहिजे. याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवदेन दिले आहे.-कृष्णकांत बघेल,माजी सरपंच गोबरवाही.
नाकाडोंगरी धान केंद्रावरील बोनसचे अडीच कोटी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST
सध्या शेतकऱ्यांचे धान पेरणीचा हंगाम सुरु झाला असून या कालावधीत शेतकऱ्यांना बि बियाणे, खते खरेदीसाठी पैसे तात्काळ जमा करणे गरजेचे आहे. नाकाडोंगरी लगतच्या गर्रा बघेडा, डोंगरी बु., आष्टी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची पूर्ण रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोनसची मागणी जोर धरत आहे.
नाकाडोंगरी धान केंद्रावरील बोनसचे अडीच कोटी थकीत
ठळक मुद्देशेतकरी संकटात : ३५ हजार ७६४ क्विंटलची खरेदी