डोंगरला येथे १२ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:47 AM2018-04-20T00:47:33+5:302018-04-20T00:47:33+5:30

विवाहाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डोंगरला येथे करण्यात आले. या सोहळ्यात माळी समाजातील एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली.

Twelve married couples here in the hill | डोंगरला येथे १२ जोडपी विवाहबद्ध

डोंगरला येथे १२ जोडपी विवाहबद्ध

Next
ठळक मुद्देमाळी समाजाचा उपक्रम : संसारपयोगी साहित्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विवाहाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डोंगरला येथे करण्यात आले. या सोहळ्यात माळी समाजातील एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली.
तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील माळी समाज सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आ.चरण वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, विजय सहारे, राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, जि.प. महिला बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, अ‍ॅड.रविभूषण भुसारी, विठ्ठल कहालकर, लक्ष्मीकांत बानेवार, कुसुमताई कामळे, बंडूभाऊ बनकर, शंकर राऊत, काँग्रेस तालुका अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष नामदेव कामळे, राधेशाम आमकर, कविता बनकर, माजी सभापती पं.स. आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.
मागील १२ वर्षापासून डोंगरला येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला व तांदळाएवजी पुष्प पाकळ्या अक्षदा म्हणून वरवधूवर वर्षाव करण्याकरिता देण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आधुनिक युगात विवाह पद्धतीवर होणाऱ्या अतोनात खर्चावर सामूहिक विवाह सोहळ्यावर आळा बसविता येतो. या सोहळ्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नातेसंबंध वृद्धींगत होतात. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्याला समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या वतीने बाराही जोडप्यांना संसारपयोगी साहित्याचे व ज्योतिबा - सावित्रीच्या फोटोचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पंचक्रोषीतील माळी बांधव तथा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष नामदेव कामळे, उपाध्यक्ष गणेश राऊत, सचिव शंकर गिरडकर, सहसचिव जोशी नेरकर, कोषाध्यक्ष मुरलीधर बनकर, शंकर राऊत, तुलाराम बागडे, शालीकराम नंदरधने, यादोराव बोरकर, अशोक बनकर, माधोराव गायधने, चैतराम बनकर व लता किरणापुरे सदस्य, ताराचंद कटनकर, राधेशाम आमकर, सेवकराम किरणापुरे, कामळे या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Twelve married couples here in the hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न