तुमसर-बपेरा राज्यमार्ग चौपदरीकरण होणार
By Admin | Updated: October 30, 2015 00:52 IST2015-10-30T00:52:27+5:302015-10-30T00:52:27+5:30
नागपुरातील मिहान कार्गो हब व मध्यप्रदेशातील कान्हा किसली अभयारण्याला विकसीत करण्यात येत असल्याने ...

तुमसर-बपेरा राज्यमार्ग चौपदरीकरण होणार
राज्य शासनाला प्रस्ताव : कान्हा किसली अभयारण्याला जोडणार
रंजित चिंचखेडे चुल्हाड
नागपुरातील मिहान कार्गो हब व मध्यप्रदेशातील कान्हा किसली अभयारण्याला विकसीत करण्यात येत असल्याने राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. तुमसर बपेरा राज्य मार्ग चौपदरीकरण करणाचे प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याला जोडणारा तुमसर बपेरा राज्य मार्ग २७१ आहे. बपेरा गाव भंडारा जिल्ह्याच्या अंतीम टोकावर असून बावनथडी नदी ओलांडताच मध्यप्रदेश् राज्याच्या सीमेला सुरुवात होत आहे. या नदीवरील पुलाचे बांधकाम महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्याच्या संयुक्त निधीतून झाले आहे. मध्यप्रदेशत असणाऱ्या कान्हा किसली अभयारण्याला विकसीत करण्याचे प्रयत्न राज्य शासन करीत आहे. अन्य राज्यांना जोडणारी राज्य मार्गाचे चौपदरीकरणाचे कामांना गती देण्यात आली आहे. मोवाड ते बालाघाट या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असल्याने तुमसर बपेरा राज्य मार्गाचे विकास याच धर्तीवर केले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नागपुरात मिहान आणि कार्बो हबच्या कामांना गती देण्यात आली असल्याने नजीकच्या सीमावर्ती राज्याची शहरे राज्य मार्गानी जोडली जाणार आहेत. विकसीत कार्यात अडथळे निर्माण होणार नाही. या करिता कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यातच मध्यप्रदेशच्या राज्य शासनाने मोवाड बालाघाट मार्गाचे चौपदरीकरणा तथा रुंदीकरणाचे कामे सुरु केल्याने बपेरा तुमसर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाला महाराष्ट्र शासन हिरवा कंदिल देणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात मार्गाचे सर्र्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
तुमसर शहरात राज्य मार्ग निर्मितीला अडथळा असला तरी, या आधी बायपास मार्गाचे नियोजन तयार करण्यात आले आहे. यामुळे मार्गाची पुर्नबांधणी, रुंदीकरण, चौपदरीकरण तथा पुलाचे बांधकाम मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. तुमसर बपेरा राज्य मार्ग चौपदरीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाला सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सादर करण्यात आलेला आहे. यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळताच पुढील प्रक्रियांना सुरुवात केली जाणार आहे.
दरम्यान दोन्ही राज्यात एकाच पक्षाचे सरकार असून मध्यप्रदेश शासनाने मोवाड बालाघाट राज्य मार्गाला हिरवा कंदिल दिल्याने बपेरा तुमसर राज्य मार्गाला मंजुरी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु तुर्तास या राज्य मार्ग निर्मिती व चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसून प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असल्याची माहिती मिळाली आहे.
सिहोरा परिसरात धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे गोंदिया शहराला जोडणारे अंतर कमी झाले आहे. धरणावरून दुहेरी वाहतूक सुरु आहे. यामुळे गोंदिया रामटेक शहराला थेट जोडणारा हा धरण महत्वपूर्ण ठरत आहे. या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी सिहोरा गावातून मार्ग विकसीत केला जाणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. या दिशेने मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु नंतर माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. रस्ते विकासाला ब्रेक लावण्यात आला आहे. यामुळे अरुंद रस्त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. वांगी, वाहनी गावानजीक या मार्गावरून ये जा करताना अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकात कमालीची दहशत निर्माण होत आहे. शासनस्तरावर रस्ते, राज्य मार्ग विकासाला मंजुरी देण्याची मागणी होत आहे.