ग्रीन व्हॅली पर्यटन स्थळ बंद

By Admin | Updated: August 20, 2014 23:22 IST2014-08-20T23:22:21+5:302014-08-20T23:22:21+5:30

भंडारा जिल्ह्यातील एकमेव ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ बंद आहे. या पर्यटन स्थळाला संजिवनी देण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा शासन स्तरार अनास्था आहे. यामुळे पर्यटकंत नाराजीचा सुर

Turn off the Green Valley tourist spot | ग्रीन व्हॅली पर्यटन स्थळ बंद

ग्रीन व्हॅली पर्यटन स्थळ बंद

चुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यातील एकमेव ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ बंद आहे. या पर्यटन स्थळाला संजिवनी देण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा शासन स्तरार अनास्था आहे. यामुळे पर्यटकंत नाराजीचा सुर असून पर्यटनाला अच्छे दिन केव्हा येणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
राज्य शासन पर्यटन विभागाच्या अखत्यारित असलेला भंडारा जिल्ह्यातील एकमेव ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ गेल्या आॅगस्ट २०१२ पासून बंद आहे. पर्यटन स्थळातील सर्व साहित्याची नासधुस झाली आहे. पर्यटन स्थळाची साक्ष देणाऱ्या खुणा आता नाहीत. या पर्यटन स्थळात वैभव आहे. या वैभावाचे चिज करणारे नाहीत. सातपुडा पर्वत रांगेचे घनदाट जंगल, वन्य प्राण्यांचा मुक्त संचार, विस्तीर्ण जलायश आणि भाविकांचे जागृत हनुमान देवस्थान, पुरातन चांदशांवलीची दरगाह, किल्ल्याची भिंत आदी पर्यटक व भाविकांना भुरळ घालणारे आहेत. परंतु सर्वांना जोपासणारा प्रशासन आंधळा आणि बहिरा झाला आहे. सिहोरा परिसरातील अर्थव्यवस्था फुगविणारा पर्यटन स्थळ शेवटच्या घटका मोजत आहे. परंतु कुणी गांभीर्याने घेत नाही. पर्यटन स्थळ सुरू असताना जिल्ह्यातील अन्य व्यवसायीकांनी व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केली होती. हॉटेल, कॉलेज तथा दुकाने थाटली होती. यात स्थानिक बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाले होते.
पर्यटन स्थळाच्या माध्यमातून शासनाला प्राप्त होणारा महसूल बुडाला आहे. कुणाचे वेतन अडत नसल्याने आर्थिक स्त्रोतावर शासन गप्प आहे. पर्यटन स्थळाचा करारनामा संपला असताना नव्या निविदा काढण्याची गरज होती. तशी प्रक्रिया शासन स्तरावर राबविण्यात आली नाही. रोजगारांचे एक साधन असताना प्रयत्न झाले नाही. यामुळे पर्यटन स्थळात ओसाड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पर्यटन स्थळाच्या जंगलात सिमेंट रस्त्याचे जाडे विनले जात आहे. या बांधकामावर कोट्यवधी खर्च केली जात आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी हा विकास असला तरी वन्य प्राणीच या रस्त्यांचा उपयोग करीत आहेत. पर्यटन स्थळ सुरू असताना पर्यटक सुरक्षीत होते. व्यवसायीकांचे साहित्य शाबूत होते. आता सर्वच धोक्यात आली आहेत. प्रेमीयुगल पर्यटकांची लुटातुट सुरू झाली आहे. काही तरूणाची टोळी या पे्रमीयुगलांना टारगेट करीत आहेत. याचे चित्रिकरण करीत आहेत. बदनामीचे धाक दाखवून पैसे, दागिने, आदींचा लुट करीत आहो. हे पे्रमीयुगल यांची व्याचता करीत नाहीत. (वार्ताहर)

Web Title: Turn off the Green Valley tourist spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.