तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:01+5:302021-09-17T04:42:01+5:30
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा गावात वाहनांचे अतिक्रमणात असणाऱ्या भंडारा - बालाघाट राष्ट्रीय महामार्गाने पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे ...

तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गाने घेतला मोकळा श्वास
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा गावात वाहनांचे अतिक्रमणात असणाऱ्या भंडारा - बालाघाट राष्ट्रीय महामार्गाने पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांच्या निर्णयामुळे अखेर मोकळा श्वास घेतला आहे. मार्गावर उभे करण्यात येणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत असल्याने शिस्तीचे पालन करण्यात येत आहे. मार्गावर वाहने उभे ठेवल्याचे आढळून आल्यास पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाने वाहनचालकांना बजावले आहे. यामुळे पार्किंगमध्ये वाहने उभे केले जात आहेत.
तुमसर-बपेरा या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. भंडारा-बालाघाट असे या राष्ट्रीय महामार्गाचे नामकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग सिहोऱ्यातून गेला आहे. सिहोरा गावाला ४७ गावाची प्रमुख बाजारपेठ गणली जात आहे. या गावात सर्व व बहुतांश शासकीय कार्यलय राष्ट्रीय महामार्गचे कडेला असल्याने ग्राहकांची रेलचेल राहत आहे. बँकेत येणारी ग्राहक थेट राष्ट्रीय महामार्गावर वाहने उभे करीत आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शनिवारचा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर आयोजित करण्यात आले होते. थेट दुकाने थाटले जात होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढल्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी व्यावसायिक व ग्रामपंचायतमध्ये समन्वयातून राष्ट्रीय महामार्गावरुन दुकाने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. राष्ट्रीय महामार्गावर आता दुकाने थाटण्यात येत नसल्याने मार्ग मोकळा झाला आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असल्याने नागरिकांची रेलचेल या गावात आहेत. शासकीय कामकाजाकरिता येणारे वाहन चालक थेट राष्ट्रीय महामार्गावर वाहने उभे करीत आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहने उभे करणाऱ्या वाहनचालकाना वाहतूक पोलीस सतीश सार्वे यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु बहुतांश प्रमाणात सहकार्य मिळाले नाही. वाहनचालक सहकार्य करीत नसल्याने पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी वाहनचालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
चौपदरीकरण कामांची अपेक्षा
सिहोऱ्यातून जाणाऱ्या या भंडारा बालाघाट मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. चौपदरीकरणच्या कामांना जलद गतीने सुरुवात करण्याची ओरड सुरू झाली आहे. अधिक नागमोडी वळण आणि मार्गावर झुडपे वाढल्याने मार्गाची रुंदी कमी झाली आहे. दोन वाहने मार्गक्रमण करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. अपघातही वाढले आहेत. या मार्गाचे कामांना जलद गतीने सुरुवात करण्याची मागणी आहे.
कोट
बसस्थानक, गोबरवाही फाटा चौक ते बँक ऑफ इंडिया चौकपर्यंत वाहनांची वर्दळ अधिक राहत असल्याने थेट वाहने राष्ट्रीय महामार्गावर उभे केले जात असल्याने अपघाताची शक्यता राहत आहे. वाहनचालकांनी राष्ट्रीय महामार्ग सोडून वाहने उभे करावे असे फलक लावण्यात आले आहे. यात वाहनचालकांनी सहकार्य करायला पाहिजे. थेट राष्ट्रीय महामार्गावर वाहने आढळून आल्यास निश्चितच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नारायण तुरकुंडे, पोलीस निरीक्षक, सिहोरा.