सूर्यकेतू नगरातील नाल्या तुंबूनच

By Admin | Updated: June 4, 2014 23:31 IST2014-06-04T23:31:05+5:302014-06-04T23:31:05+5:30

पावसाळा अगदी तोंडावर असताना, खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सूर्यकेतू नगरातील मुख्य व सब नाल्या ह्या सध्याच्या घडीला तुंबून भरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन

Tulambuch, Nala Tumbounch of the city of Sunk | सूर्यकेतू नगरातील नाल्या तुंबूनच

सूर्यकेतू नगरातील नाल्या तुंबूनच

भंडारा :  पावसाळा अगदी तोंडावर असताना, खात रोडवरील खोकरला  ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सूर्यकेतू नगरातील मुख्य व सब नाल्या ह्या सध्याच्या घडीला तुंबून भरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन डासांचा प्रकोप मोठय़ा प्रमाणात झाला आहे.
वॉर्डातील नागरिकांनी संबंधित वॉर्ड सदस्याला व ग्रामपंचायतला वेळोवेळी, कधी कधी तर  भ्रमणध्वनीवरुन वॉर्डात असलेली समस्या सांगण्यात आली. परंतु वॉर्डाचे असलेले वॉर्ड सदस्य व ग्रामपंचायतकडून सुद्धा त्याची तसदी न घेता असलेली समस्या आज जैसे थे असल्याने सुर्यकेतु नगरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
दुर्लक्ष होण्याचे कारण शोधले असता या ग्रामपंचायतमधील सचिव हे काही कारणास्तव लांब सुटीवर असल्याचे समजते. तसेच येथील महिला सरपंच  या वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करीत नसल्याचे समजले. याही पलीकडे  गेले तर कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतला कुलूप असल्याचे दिसून आले.
सविस्तर असे की, पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या ह्या मोठय़ा प्रमाणात उद्भवत असतात. परिणाम म्हणून पावसाळ्यापूर्वी वॉर्डातील सांडपाणी व गटार वाहून नेणार्‍या नाल्या व सबनाल्यांची सफाई करण्यात येते. 
परंतु खोकरला ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरुी आहे. याचे कारण म्हणजे ग्रामपंचायतमधील पदाधिकार्‍यांमध्ये असलेला असमन्वय.
या ग्रामपंचायतमध्ये विकासाला गती न देता फक्त राजकारणालाच महत्व देत असल्याची ओरड वॉर्डवासीयांकडून केली जात आहे. त्याचे कारण म्हणजे जून महिन्यापासून पावसाचे नक्षत्र सुरू होत आहे.
असे असले तरी मात्र अद्यापही अंतर्गत येत असलेल्या सुर्यकेतूनगर व इतर नव्या नगरातील वसाहतींमधील नाल्या ह्या घाणीने तुंबून आहे. वरील असलेल्या समस्येबाबत वेळोवेळी खोकरला ग्रामपंचायतला व वॉर्डातील संबंधित वॉर्ड सदस्याला नागरिक यांनी कळविले. परंतु त्यांचेकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
बर्‍याचवेळा त्यांना कळविण्यासाठी खोकरला येथील नागरिक हे ग्रामपंचायतमध्ये गेले असता येथील सचिव काही कारणास्तव लांब सुटीवर असल्याने व महिला सरपंचाचे दुर्लक्ष होत असल्याने परिणामी कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतला कुलूप लागल्याची बाब समोर येऊन समस्याधारकांना  आल्यापावली परतावे लागते. विशेष म्हणजे काही कामे ही ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहेत.
परंतु ते देखील थातूरमातूर पद्धतीने. त्यामुळे सूर्यकेतूनगरातील नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Tulambuch, Nala Tumbounch of the city of Sunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.