शोषितांच्या वेदना काव्यातून मांडणे हेच खरे काव्यप्रयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:04 IST2018-10-29T22:04:06+5:302018-10-29T22:04:29+5:30
कवितेच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केलेल्या आहेत, कवितेची विविध प्रयोजनेही अनेक विचारवंतांनी सांगितलेली आहे पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन शोषितांच्या, उपेक्षितांच्या व्यथा ,वेदना आपल्या कवितेतून मांडत राहणे हेच खरे काव्यप्रयोजन आहे, असे उद्गार अध्यक्षीय भाषण करताना प्रसिद्ध कवी , नाटककार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी काढले.

शोषितांच्या वेदना काव्यातून मांडणे हेच खरे काव्यप्रयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कवितेच्या वेगवेगळ्या व्याख्या अनेकांनी केलेल्या आहेत, कवितेची विविध प्रयोजनेही अनेक विचारवंतांनी सांगितलेली आहे पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन शोषितांच्या, उपेक्षितांच्या व्यथा ,वेदना आपल्या कवितेतून मांडत राहणे हेच खरे काव्यप्रयोजन आहे, असे उद्गार अध्यक्षीय भाषण करताना प्रसिद्ध कवी , नाटककार डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी काढले. विदर्भ साहित्य संघ, भंडारा व सार्वजनिक वाचनालय भंडारा आयोजित रंग कवितेचे या वाड्मयीन कार्यक्रमात ते बोलत होते. नुकतेच रंग कवितेचे या बहारदार काव्य मैफलीचे आयोजन सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. रंग कवितेचे या कार्यक्रमाचे निमंत्रित कवी पुनीत मातकर, गडचिरोली हे होते. सूत्रनिवेदक युवा कवी अविनाश पोईनकर चंद्रपूर हे होते. या कार्यक्रमाचे उदघाटन समाजसेवक अमृत बन्सोड यांनी केले. प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध गझलकार प्रल्हाद सोनेवाने, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ भंडारा तसेच सार्वजनिक वाचनालयाचे सहसचिव प्रदीप गादेवार आदी मान्यवर होते.
कवी पुनीत मातकर यांनी कार्यक्रमात आपल्या कवितेचे विविध रंग भरून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तेवढचे युवा कवी अविनाश पोईनकर यांनी बहारदार सूत्रनिवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी मांडली तसेच संकल्पना विवेक कापगते यांनी समर्पक शब्दात विशद केली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मासूरकर यांनी केले. तसेच आभार एक स्वप्न एक आशा या संघटनेची युवा कार्यकर्ती टीना कटकवार हिने केले.
या कार्यक्रमाला डॉ.गुणवंत धात्रक , डॉ. के.एल.देशपांडे, डॉ.जयश्री सातोकर, प्रा, सुनीता रंगारी, प्रा.फुलझेले, हर्षल मेश्राम, कवयित्री अर्चना मोहनकर, मनोज केवट आदी उपस्थित होते.रंग कवितेचे या कार्यक्रमासाठी भंडारा,तुमसर लाखनी, पवनी, मोहाडी, गोरेगाव येथील रसिकांनी गर्दी केलेली होती. या कार्यक्रमासाठी मनोज केवट, विवेक कापगते, प्रमोदकुमार अणेराव, घनशाम कानतोडे, युवराज खोब्रागडे यांनी सहकार्य केले.