तुडतुड्याने तीन एकरातील धानपीक नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:51 IST2017-11-05T21:51:31+5:302017-11-05T21:51:43+5:30
शहापूरजवळील नांदोरा येथील रामदास चोपकर यांच्या तीन एकर शेतातील धानपिक तुडतुडा व मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे नष्ट झालेला आहे.

तुडतुड्याने तीन एकरातील धानपीक नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
खरबी (नाका) : शहापूरजवळील नांदोरा येथील रामदास चोपकर यांच्या तीन एकर शेतातील धानपिक तुडतुडा व मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे नष्ट झालेला आहे. यावर्षी पावसामुळे अनेक शेतकºयांना वेळेवर रोवणी करता आली नाही. त्यातून मार्ग काढत शेतकºयांनी मिळेल त्या मार्गाने रोवणी करण्याचा प्रयत्न केला. आणि आता हाताशी आलेल्या धानपिकाचे तुडतुड्यामुळे नुकसान होऊन पीक व्यर्थ गेले. एकीकडे तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे वन्यप्राणी शेतपिकांचे नुकसान करीत आहे.
नांदोरा परिसरात तुडतुड्याने मोठ्या प्रमाणात धानपीक फस्त केले. त्यामुळे शेतकरी तुडतुड्याच्या भितीने धानाची कापणी करत आहेत. यावेळी कृषी सहायक रेणुका दराडे यांनी शेतकºयांच्या शेतावर जावून सरपंच वनिता पिकलमुंडे, पोलीस पाटील यांच्यासह धानपिकाची पाहणी केली असून तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची कापणी करावी, असे कृषी सहायक रेणुका दराडे यांनी सांगितले.
जीवाचे रान करुन शेतकºयांनी पिकविलेल्या शेतावर नैसर्गिक संकटे वाढत असताना तुडतुड्याच्या आक्रमनाने नांदोरा, परसोडी, खरबी परिसरातील शेतकरी चिंतेत आहे. धान उत्पादक शेतकºयांना अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पावसाच्या अनियमततेमुळे शेतकºयांच्या हाताशी आलेला घास तुडतुडा किडीमुळे हिरावुन घेतला आहे. नांदोरा, परसोडी, खराडी, उमरी परिसरात पावसाअभावी बºयाच शेतकºयांनी धानाची रोवणी केली नाही. काहीनी रोवणी केली तर कापणीच्या तोंडावर तुडतुड्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.