सहा ब्रास रेतीसह ट्रक, जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST2021-04-04T04:37:01+5:302021-04-04T04:37:01+5:30
भंडारा : पवनी तालुक्यातील पवना बुज. शिवारातील स्मशानभूमीत केलेल्या अवैध रेतीसाठ्यावर पोलिसांनी धाड मारुन सहा ब्रास रेतीसह दोन ट्रक ...

सहा ब्रास रेतीसह ट्रक, जेसीबी जप्त
भंडारा : पवनी तालुक्यातील पवना बुज. शिवारातील स्मशानभूमीत केलेल्या अवैध रेतीसाठ्यावर पोलिसांनी धाड मारुन सहा ब्रास रेतीसह दोन ट्रक आणि जेसीबी जप्त केला. ही कारवाई पवनी पोलिसांनी शुक्रवारी रात्री केली.
मिथून प्रकाश चकोले (२३) रा.शिवनाळा, विष्णू शिवा मेश्राम (३२) रा.विरली, रोशन यशवंत सावरबांधे (३३) रा.उमरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवना (बुज.) येथील स्मशानभूमी परिसरात रेतीचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन धाड टाकली असता रोशन सावरबांधे हा जेसीबीद्वारे दोन ट्रकमध्ये रेती भरत असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी सहा ब्रास रेतीसह दोन ट्रक आणि जेसीबी जप्त केला. ५५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई सत्यवान हेमणे यांनी पवनी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत. पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याचा साठा केला जात असल्याचे या कारवाईवरुन सिद्ध झाले.