ट्रकची मंदिराला धडक
By Admin | Updated: June 21, 2016 00:26 IST2016-06-21T00:26:06+5:302016-06-21T00:26:06+5:30
येथील नागभीड-नागपूर रोडवर बस स्टॉपजवळ असलेल्या माता मंदिराला २० जून च्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान ट्रकने ...

ट्रकची मंदिराला धडक
भुयार येथील घटना : एक जखमी
भुयार : येथील नागभीड-नागपूर रोडवर बस स्टॉपजवळ असलेल्या माता मंदिराला २० जून च्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान ट्रकने माता मंदिराला धडक दिल्याने मंदिराची तोडफोड होवून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, भुयार येथील बसस्टॉपजवळील पानठेल्यासमोर ट्रक एम एच ४९ - ०२४३ चा चालक दादाराव नामदेव वराडकर (५०) हा चहा पिण्यासाठी थांबला होता. ट्रक वरोरावरुन येत होता. मात्र त्याच्या मागून सिमेंट भरुन येणारा ट्रक एम एच ३५ के ८८२९ रामटेकला जात असताना उभ्या असलेल्या ट्रक माता मंदिराला धडकला. त्यात मंदिराची तोडफोड होऊन मोठे नुकसान झाले व ट्रक क्र. एम एच ३५ के ८८२९ चा चालक नितेश व्यंकटी गोस्की (२५) चंद्रपूर हा जखमी झाला. (वार्ताहर)