ट्रक चालकाच्या डुलकीने गेला प्रवाशाचा प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:02+5:302021-08-22T04:38:02+5:30

महेश संताेष शाहू (४०) रा. पारडी हल्ली मु. खैरागड (छत्तीसगढ) असे मृताचे नाव आहे. तर अंजाेर संताेष शाहू (५०) ...

The truck driver's nod killed the passenger | ट्रक चालकाच्या डुलकीने गेला प्रवाशाचा प्राण

ट्रक चालकाच्या डुलकीने गेला प्रवाशाचा प्राण

महेश संताेष शाहू (४०) रा. पारडी हल्ली मु. खैरागड (छत्तीसगढ) असे मृताचे नाव आहे. तर अंजाेर संताेष शाहू (५०) असे जखमीचे नाव आहे. ट्रक क्रमांक एमएच ४८ जे १००६ नागपूरवरून रायपूरकडे जात हाेता. ट्रक महेंद्र सूरजलाल मडावी (३५) रा. पारडी चालवित हाेता. पारडी येथे त्याच्या ओळखीचे महेश आणि अंजाेर भेटले. त्यांनाही रायपूरला जायचे हाेते. त्यामुळे ते दाेघेही या ट्रकमध्ये बसले. ट्रक रायपूरकडे जात असताना चिखली फाट्याजवळ चालक महेंद्रला डुलकी आली. यातच ट्रक अनियंत्रित हाेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकवर जाऊन आदळला. त्यात महेश ठार झाला तर अंजाेर हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चालक महेंद्र मडावी याने जवाहरनगर ठाण्यात माहिती दिली. पाेलिसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक गिरीश राणे करीत आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर उभा असलेला ट्रक तेथून निघून गेला.

Web Title: The truck driver's nod killed the passenger