शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रस्ता ओलांडताना ट्रकने विद्यार्थीनीला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघालेल्या एका विद्यार्थीनीला रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना भंडारा लगतच्या भिलेवाडा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडले. ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला.

ठळक मुद्देभिलेवाडाची घटना : ट्रक सोडून चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघालेल्या एका विद्यार्थीनीला रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना भंडारा लगतच्या भिलेवाडा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडले. ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला.सृष्टी किसन हाडगे (१८) रा. गणेशपूर (भंडारा) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती शहरालगतच्या भिलेवाडा येथील जे.जे. कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होती. शनिवारी सकाळी ती महाविद्यालयात जाण्यासाठी भंडारा येथून आॅटो रिक्षाने निघाली. भिलेवाडा येथे आॅटो रिक्षातून उतरून राष्ट्रीय महामार्ग पार करताना लाखनीकडून भंडाराकडे येणाऱ्या ट्रकने (क्रमांक सीजी ०७ सीए ८३७७) सृष्टीला धडक दिली. यावेळी ट्रकने मागील चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा होवून मेंदू रस्त्यावर फेकला गेला.हा प्रकार दिसताच भिलेवाडा येथील नागरिकांनी धाव घेतली. दरम्यान ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला. नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गजानन कंकाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कऱ्हाडे, बुरळे, अशोक सरोद आणि राठोड करीत आहेत. ट्रक जप्त करण्यात आला असून कारधा पोलीस चालकाचा शोध घेत आहे.सृष्टी ही गरीब कुटुंबातील विद्यार्थीनी असून आई मोल मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढते. या अपघाताने हाडगे परिवारावर दु:खाचा डोंगर पसरला. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकजण हळहळताना दिसत होता.

टॅग्स :Accidentअपघात