वृक्षारोपण करून वाहिली वडिलांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:42 IST2021-09-10T04:42:26+5:302021-09-10T04:42:26+5:30

०९ लोक ०८ के विरली (बु.) : पवनी तालुक्यातील धामनी येथील हिरालाल देशमुख , देवेंद्र देशमुख आणि त्यांच्या बहिणींनी ...

Tribute to Vahili father by planting trees | वृक्षारोपण करून वाहिली वडिलांना श्रद्धांजली

वृक्षारोपण करून वाहिली वडिलांना श्रद्धांजली

०९ लोक ०८ के

विरली (बु.) : पवनी तालुक्यातील धामनी येथील हिरालाल देशमुख , देवेंद्र देशमुख आणि त्यांच्या बहिणींनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ स्थानिक स्मशानभूमीत वृक्षारोपण करून चौदावीच्या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासमोर एक आदर्श ठेवला. धामणी येथील सेवानिवृत्त शिक्षक शामराव देशमुख यांचे निधन झाले. बुधवारी त्यांच्या चौदावीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक स्मशानभूमीत वड व पिंपळाच्या रोपांचे रोपण केले. यावेळी हिरालाल देशमुख , देवेंद्र देशमुख, श्रीधर बोरकर , पुरुषोत्तम समरीत , भोजराज लांजेवार , तालिका देशमुख , वीणा देशमुख , उषा बोरकर , छाया समरीत , कोठीराम घावळे , सुशांत देशमुख , भाग्यश्री देशमुख व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Tribute to Vahili father by planting trees