समतानगर येथे बाबासाहेबांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:10+5:302021-04-24T04:36:10+5:30
भंडारा : कोरोनाचे सावट लक्षात घेता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती समतानगर फेज-२ येथील प्रा.बबन मेश्राम ...

समतानगर येथे बाबासाहेबांना आदरांजली
भंडारा : कोरोनाचे सावट लक्षात घेता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती समतानगर फेज-२ येथील प्रा.बबन मेश्राम यांनी परिवारातील सदस्यांसह घरीच साजरी केली. यावेळी प्रज्वल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट व निर्सग नॅचरोपॅथी उपचार केंद्राच्या वतीने बाबासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देऊन बाबासाहेबांची जयंती समता दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी पवनदास मेश्राम, ताराबाई तिडके, प्रा.बबन मेश्राम, प्राचार्या डॉ.सुलभा मेश्राम, प्राजंल मेश्राम, प्रज्वल मेश्राम, इंजि.रक्षा बोरकर, इन्स्टिट्यूटचे शिक्षक आचल पटले, लुकेश बोरकरसह विद्यार्थी रोनिता मडावी, पूनम घडोले, राजश्री जत्ता, निकिता देवतारे, पल्लवी वासनिक, करिना धांडे, अंजली तुमसरे, जयश्री कहालकर, रूपाली खोब्रागडे, काजल वाघमारे, चित्रा लांजेवार उपस्थित होते.