ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे लाखनीत वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:29+5:302021-08-24T04:39:29+5:30
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे सहा वर्षांपूर्वी लाखनी बसस्थानकातील पडिक जागेवर विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. ...

ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे लाखनीत वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे सहा वर्षांपूर्वी लाखनी बसस्थानकातील पडिक जागेवर विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. आज या झाडांना बघता बघता ५ वर्षे पूर्ण झाली असून, त्यांचे डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. ही झाडे येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांना हिरवे सौंदर्य, सावलीसह सुखद गारवा देत आहेत. यामुळे सकाळी, सायंकाळी फिरणाऱ्या नागरिकांची संख्या बसस्थानकात वाढली आहे. सकाळचा गारवा, शुद्ध प्राणवायू मिळत आहे. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब मागील पाच वर्षांपासून बसस्थानकात लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस दरवर्षी अनोख्या पद्धतीने साजरा करीत आहे. यावर्षी सुद्धा ग्रीनफ्रेंड्सतर्फे पाचव्या वर्षी ''वृक्षाचा वाढदिवस'' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा शाखा, भंडारा तसेच नेफडो जिल्हा भंडाराचे सहकार्य लाभले. प्रा. अशोक गायधने यांनी प्रास्ताविकात केले. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी दिनकर कालेजवार, मारोतराव कावळे, अशोक वैद्य, हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे, शिक्षक श्रीधर काकिरवार, गोंदिया निवासी ललिता हलमारे यांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रीनफ्रेंड्सतर्फे ''पर्यावरणस्नेही वृक्षराख्या'' आणि 'बीजराख्या बनवा' स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राणीलक्ष्मी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हरित सेना प्रभारी शिक्षिका निधी खेडीकर यांच्या मार्गदर्शनात सुंदर पर्यावरण संदेश देणाऱ्या वृक्षराख्या व बीजराख्या तयार केल्या. सर्व स्पर्धकांनी पर्यावरण संवर्धन करणारे वृक्षसंदेश सर्व स्पर्धकांनी लिहिले. वृक्षराखी बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक सुहानी पाखमोडे, हर्षिता लुटे, केशर लांडगे यांनी, तर द्वितीय क्रमांक स्विटी लांजेवार, कशिश बडोले हिने, तर तृतीय क्रमांक डिंपल खंगार, चारूलता चवडे, मनस्वी गभने यांनी प्राप्त केला. प्रोत्साहनपर क्रमांक मनीषा काटगाये, गायत्री वैद्य, अर्णव गायधने यांना मिळाले. स्पर्धेत सुहानी पाखमोडे प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक फाल्गुनी हजारे हिला व तृतीय क्रमांक पायल पाखमोडे हिला प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक जिया शेख, दिया क्षीरसागर, चारू वैद्य, नंदिनी बावनकुळे, हिमांशी पडोळे, जान्हवी वाघाये यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण दिनकर कालेजवार, मारोतराव कावळे, श्रीधर काकीरवार, ललिता हलमारे, विजय हलमारे, भार्गवी काकीरवार यांनी केले. यानंतर ललिता विजय हलमारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन अशोक वैद्य यांनी केले. कार्यक्रमासाठी साकोली बस आगारप्रमुख गौतम शेंडे, लाखनी वाहतूक नियंत्रक बी. एन. डहाके, राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाच्या हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, ओम आगलावे, आरु आगलावे, दादाराम बावनकुळे यांनी सहकार्य केले.