डम्पिंग यॉर्ड बनले कचरा जाळण्याचे ठिकाण
By Admin | Updated: February 18, 2017 00:18 IST2017-02-18T00:18:49+5:302017-02-18T00:18:49+5:30
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याकरिता शहराबाहेर डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला.

डम्पिंग यॉर्ड बनले कचरा जाळण्याचे ठिकाण
धुरामुळे आरोग्यावर परिणाम : दुर्गंधीच्या समस्येत वाढ
तुमसर : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याकरिता शहराबाहेर डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला. याकरिता तीन इमारती बांधण्यात आल्या. तिथे जाण्याकरिता रस्ता व पूल तयार केला, परंतु केवळ कचरा जाळण्याचेच काम येथे सुरु आहे. डम्पिंग यार्ड केवळ कचरा जाळण्याचा डेपो बनले आहे. डम्पिंग यार्डमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
तुमसर नगरपालिका प्रशासनाने तुमसर-डोंगरला रस्त्यावर टुमनी नाल्याशेजारी मोठे कचऱ्याचे डम्पिंग यार्ड तयार केले. लाखो रुपये खर्च करुन हे डेपो तयार केले. येथे तीन इमारती तयार करण्यात आल्या. येथे जाण्याकरिता सिमेंट रस्ता तयार केला. नाल्यावर लहान पूल बांधण्यात आल्या. कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र प्रस्तावित होते. येथे ते दिसत नाही. केवळ कचऱ्याला आगीत स्वाहा करण्याचा येथे कार्यक्रम सुरु आहे. दिवसभर व रात्री येथून धूर निघतांनी दिसतो.
या मार्गावरुन जातांनी कधी-कधी मोठी दुर्गंधी येते. नाक दाबूनच येथुन मार्गक्रमण करावे लागते. लक्षावधी रुपये खर्च करुन डम्पींग यार्ड तयार करण्यात आला.पंरतु मुख्य उद्देशाकडे येथे पाठ फिरविण्यात आली. शहर स्वच्छ करण्याकरिता डम्पींग यार्डचे मोठे महत्व आहे. पंरतु त्याकरिता येथे अजूनपर्यंत मुहूर्त सापडला नाही असे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
कचऱ्याला आग लावली जात नाही. गॅस बर्निंगमुळे धूर व कधी आग लागते. खत प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आहे. डीपीआरमधून मंजूरी (निधी) प्राप्त झाल्यावर खत प्रकल्प सुरु केला जाणार आहे.
चंद्रशेखर गुल्हाणे,
मुख्याधिकारी न.प. तुमसर