शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पारदर्शी व्यवहाराने वाढतो ग्राहकांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झेडपीएसके या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अ‍ॅपच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होईल अशी माहितीही बुरडे यांनी दिली. आमदार भोंडेकर यांनीही या अ‍ॅपबद्दल कौतूक व्यक्त करून संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

ठळक मुद्देनरेंद्र भोंडेकर : भंडारात गुणवंतांचा गौरव, जिल्हा परिषद व शासकीय सहकारी संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणत्याही क्षेत्रात सहकार्य व विश्वास असल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. सार्वजनिक क्षेत्र असो की खासगी किंवा एखादी संस्था त्यात सभासदांचे हित जोपासताना सामाजिक हिताचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यातच पारदर्शी व्यवहाराने ग्राहकांचा पर्यायाने सर्र्वांचाच विश्वास संपादित करता येतो, असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थातर्फे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सभासदांचे गुणवंत पाल्य, सेवानिवृत्त सभासद व आदर्श शिक्षक यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. येथील साई मंगल कार्यालयात पार पडलेल्या शानदार सोहळ्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्य अतिथी आमदार नरेंद्र भोंडेकर व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी माजी आमदार व शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थसमिती सभापती धनेंद्र तुरकर, संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांच्यासह सभासदगण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झेडपीएसके या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अ‍ॅपच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होईल अशी माहितीही बुरडे यांनी दिली. आमदार भोंडेकर यांनीही या अ‍ॅपबद्दल कौतूक व्यक्त करून संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे म्हणाले, सेवानिवृत सभासदांनी भावी आयुष्य समाजसेवेकरिता समर्पीत करावे असे आवाहन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंत पाल्य, आदर्श शिक्षक व सेवानिवृत सभासदांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रतीक्षा बेदपुरिया, अवंती पत्थे, ओंकार चोपकर, राखी चिरवतकर, मानसी ब्राम्हणकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर उपस्थितांनी त्यांच्या विचारांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली. संचालन शाखाध्यक्ष किशोर ईश्वरकर व दिलीप ब्राम्हणकर यांनी केले. आभार संचालक विलास टिचकुले यांनी केले कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कक्षप, शाखाध्यक्ष मुलचंद वाघाये, परमानंद पारधी, संचालक देवराम थाटे, विजय कोये, गणेश साळुंखे, विनोद राठोड, दिनेश घोडीचोर, दिलीप बावनकर, नामदेव गभने, दिक्षा फुलझेले, संध्या गिरीपुंजे, दुर्गादास भड, प्रधान व्यवस्थापक विलास फटे व अन्य सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.गुरूंचे मार्गदर्शन नेहमी प्रेरणादायीसभापती धनेंद्र तुरकर म्हणाले, विद्यार्थी जीवनात शिक्षक हा अविभाज्य घटक असून विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी महत्वाचे स्थान भूषवित असतो. परिणामी गुरूचे स्थान व कार्य नेहमी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना संस्काराची जाण आवश्यकअध्यक्ष केशव बुरडे यांनी संस्थेच्या प्रगतीची विस्तृत माहिती दिली. तसेच सभासदांसोबतच सेवानिवृत्त सभासदांचे हित जोपासता येईल याकरिता संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, स्वत:चे कर्तव्य प्रामाणिकपणे करून आईवडीलांनी दिलेल्या संस्काराची भविष्यात जाणीव ठेवावी.

टॅग्स :zpजिल्हा परिषद