जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण करा

By Admin | Updated: September 6, 2015 00:32 IST2015-09-06T00:32:15+5:302015-09-06T00:32:15+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा व्यवहार हा पदाची प्रतिष्ठा डावलणारा व द्वेषभावनेतून प्रेरीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे स्थानांतरण करण्यात यावे,...

Transfer the Collector | जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण करा

जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण करा

मराठा युवा संघटनेची मागणी
भंडारा : जिल्हाधिकाऱ्यांचा व्यवहार हा पदाची प्रतिष्ठा डावलणारा व द्वेषभावनेतून प्रेरीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे राज्यसंघटक बापूसाहेब डवरे पाटील यांनी केली आहे.
भंडाराचे जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांच्या दरम्यान झालेली घटना योग्य प्रशासनासाठी कटीबद्धता दाखविणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्र शासनासाठी दुर्देवी अशी आहे.
जिल्हाधिकारी स्वत:च शिष्टमंडळ घेऊन भेटायला पोलीस अधीक्षकांच्या कक्षेत जातात आणि स्थानिक समस्येवर निवेदन चर्चेत समोरच्या समकक्ष अधिकाऱ्याला नाकर्ते (युसलेस) म्हणतात. त्यांची लायकी काढून समोरच्या अधिकाऱ्याला डिवचतात, त्यांचा सन्मान व प्रतिष्ठेला अन्य व्यक्तीसमोर धक्का पोहोचवितात. आणि त्यातून समोरचा अधिकारी ‘गेटआऊट,’ म्हणतो. या सर्व प्रकारास प्रवृत्त करणाऱ्या आणि घटनेला कारणीभूत ठरलेल्या जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा संघटनेकडून निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.
भंडारा येथील जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा हा व्यवहार समोरच्या अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा डावलणारा तर आहेच, याशिवाय समोरच्या अधिकाऱ्यांबाबत द्वेषभावनेने प्रेरित वर्तन आहे. दुसऱ्या अधिकाऱ्यांप्रती अपमानजनक वागणुकीमुळे जिल्हाधिकाऱ्यांविषयी जनतेत सन्मान राहणार नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Transfer the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.