धानाच्या उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण

By Admin | Updated: June 22, 2014 23:54 IST2014-06-22T23:54:21+5:302014-06-22T23:54:21+5:30

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व आत्मा यंत्रणा भंडारा यांच्या सौजन्याने कृषी पर्यवेक्षक मोहाडी यांचेमार्फत करडी व मुंढरी सर्कलमधील १४ गावांमध्ये खरीप हंगामातील धानाचे

Training for the promotion of rice production | धानाच्या उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण

धानाच्या उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण

करडी (पालोरा) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व आत्मा यंत्रणा भंडारा यांच्या सौजन्याने कृषी पर्यवेक्षक मोहाडी यांचेमार्फत करडी व मुंढरी सर्कलमधील १४ गावांमध्ये खरीप हंगामातील धानाचे उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. श्री पद्धतीने भात लागवड कशी, करावी याची माहिती प्रोजेक्टरवर देण्यात आली. बिजप्रक्रिया, ऊस व केळी पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
खरीप हंगाम सन २०१४-१५ मध्ये भात पिकाचे उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने निलजबु, नरसिंगटोला, जांभोरा, केसलवाडा, डोंगरदेव, बोंडे, किसनपूर, दवडीपार, पांजरा बोरी, बोरगाव, निलजखुर्द, मुंढरीखुर्द, खडकी, ढिवरवाडा आदी १४ गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षण कालावधीत श्री पद्धतीने धान पिकाची लागवड कशी करावी, बिजप्रक्रिया करताना काय काळजी घ्यावी, बिजप्रक्रिया कशी करावी याचे स्वत: प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. भात लागवडीचे शेतकऱ्यांना एलसीडी प्रोजेक्टरद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी पर्यवेक्षक तथा प्रभारी मंडळ अधिकारी एन.के. चांदेवार, आत्माचे ब्लॉक टेक्निकल तथा व्यवस्थापक बोरकर, करडी व मुंढरी सर्कलमधील कृषी सहायक विश्वनाथ उसावे, हुकरे, मेश्राम, रंगारी यांनी मार्गदर्शन केले. श्री पद्धत लागवडीमुळे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढीव उत्पादन घेता येते. उत्पादन खर्चही कमी येतो. पाण्याची ५० टक्के बचत होते.
पिक १० दिवस अगोदर कापणीस येतो, एकरी २ किलो बियाणे लागते त्यामुळे बियाण्यावरील खर्चात कपात होऊन बचत होते, अशी माहिती दिली गेली, सध्याच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर श्री पद्धतीने धानाची लागवड करावी, जास्तीत जास्त नफा कमवावा, अशी कळकळीची विनंतीही यावेळी मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना केली. भात लागवडीकरीता गादी वाफयावर रोपे तयार करणे, प्रत्यक्ष शेतात रोपांची लागवड करणे, तण नियंत्रण उपाययोजना, खते व पाण्याचा सुयोग्य वापर तसेच किड व रोग नियंत्रण उपाय यावर तांत्रिक मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखविण्याची तयारी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. कृषी सहायकाचे पथक त्यासाठी तयार केले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Training for the promotion of rice production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.