पंचनामा सुरू असताना ट्रॅक्टरचालकाने काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:38 IST2019-03-04T00:36:58+5:302019-03-04T00:38:00+5:30
गावातील मुख्य रस्त्याने रेती भरुन जाणारा ट्रॅक्टर तलाठी सांगोळे यांनी भर रस्त्यात पकडला. पंचनाम्याची कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभे करण्याच्या बहाणा करुन चालकाने ट्रॅक्टरच पळवीला असल्याची धक्कादायक घटना दिघोरी येथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

पंचनामा सुरू असताना ट्रॅक्टरचालकाने काढला पळ
मुकेश देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी/मोठी : गावातील मुख्य रस्त्याने रेती भरुन जाणारा ट्रॅक्टर तलाठी सांगोळे यांनी भर रस्त्यात पकडला. पंचनाम्याची कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभे करण्याच्या बहाणा करुन चालकाने ट्रॅक्टरच पळवीला असल्याची धक्कादायक घटना दिघोरी येथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
दिघोरीच्या चुलबंद नदीची रेती अत्यंत चांगल्या दर्जाची असून येथील रेतीला अर्जुनी/मोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून वाळू माफीया गावातील मुख्य रस्त्याने वाहतुक करुन रेती चोरीचा उद्योग करीत आहेत. अशातच आज तलाठी सांगोळे सदर रस्त्याने जात असतांना रेतीने भरलेला ट्रॅक्टर त्यांना दिसला. सदर रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरचा क्र. एम एच ३६ एल ५१७१ असुन ट्रालीचा क्रमांक एम एच ३६ जी २४६० हा आहे.
ट्रॅक्टर ज्या ठिकाणी पकडण्यात आला त्या ठिकाणी अडचणीचा रस्ता असून मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्रीत जमा झाले होते. त्यामुळे सदर ट्रॅक्टर शेडच्या कडेला उभा करण्याच्या उद्देशाने चालकाने चालू केला व धूम ठोकून ट्रॅक्टरसहीत पळ काढला. घडलेल्या या प्रकाराबद्दल तलाठी सांगोळे यांनी पोलीस ठाणे दिघोरी येथे कुठलीही माहिती दिली नाही व मदत मागविली नसल्याची माहिती मिळाली.
याबाबत तलाठी सांगोळे यांना भ्रमणध्वनीवर माहिती विचारली असता ते म्हणाले तहसीलदार लाखांदूर यांना सदर घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली असून सदर ट्रॅक्टरधारकावर कारवाई करण्याचे संकेत दिले असल्याचे सांगितले.
पळून जाणाऱ्या ट्रॅक्टरवर महसुल विभाग व पोलीस विभाग काय कारवाई करते याकडे दिघोरीवासीयांचे लक्ष लागले आहे.