शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यामुळे ‘ढिवरधुटी’त पर्यटकबंदी

By admin | Updated: July 21, 2014 23:41 IST

ढिवरधुटी पर्यटन स्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव परिक्षेत्रातील जंगलात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जंगलात विना परवानगीने प्रवेश करण्यावर बंदी

गोसेबुज : ढिवरधुटी पर्यटन स्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव परिक्षेत्रातील जंगलात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जंगलात विना परवानगीने प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षीपासून ढिवरधुटीकडे जाण्यासाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. परिणामी पर्यटकांमध्ये निराशा पसरली आहे.पवनी पासून नऊ किलोमीटर अंतरावर खापरी कोरंभीच्या डोंगरामध्ये ढिवरधुटी हा नैसर्गिक धबधबा आहे. माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे लुप्त झालेले हे पर्यटनस्थळ जनतेच्या नजरेत आले. मागील सात वर्षात हजारो पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे. पर्यटकांनी या निसर्गरम्य परिसराचा स्वच्छंदपणे आनंद घेतला. ढिवरधुटीचा धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी असल्यामुळे जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात हजारोच्या संख्येने पर्यटक दुरवरून येत असतात.३० फूट उंचीवरून ढिवरधुटी सुदृढ खोलगट भागात पडणाऱ्या जलधारेचे दृश्य व सभोवताल असलेले डोंगर व त्यावरील वनराजी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. कोरंभी महादेव मंदिरासमोर पोहचल्यानंतर डावीकडे जंगलात जाणाऱ्या मार्गाने काही अंतरावर उजवीकडे जंगलातील मालाई तलावाकडे जाणारा मार्ग आहे. या तलावाच्या पाळीवरून सुमारे तीन कि़मी. अंतरापर्यंत पायी चालत जावे लागते. ढिवरधुटीपासून तलावापर्यंत वाहत आलेल्या झऱ्याचे आता ओढ्यात रूपांतर झाले आहे. तीन किलोमीटर पायी चालल्यानंतर आलेला थकवा ढिवरधुटीचे मनोहारी सांैदर्य पाहून नाहिसा होतो.परंतु, ढिवरधुटी पर्यटन स्थळाचा समावेश उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव परिक्षेत्रातील जंगलात करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जंगलात विना परवानगीने प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षीपासून ढिवरधुटीकडे जाण्यासाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात वनक्षेत्राधिकारी व्ही.जे. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पावसाळ्यात ढिवरधुटी पर्यटनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेशबंदी केल्यामुळे ढिवरधुटी पाहणाऱ्या हजारो पर्यटन प्रेमीमध्ये निराशा पसरली आहे. अभयारण्य विभागाने ढिवरधुटीचा विकास करून पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेश देण्यावर विचार केल्यास पूर्व विदर्भात ढिवरधुटी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येईल, यात शंका नाही.