रस्त्यावर टोमॅटोंचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:48 PM2017-09-23T23:48:08+5:302017-09-23T23:48:20+5:30

नागपूरहून भंडाराकडे जाणाºया ट्रक व मिनीडोर यांच्यात झालेल्या धडकेनंतर ट्रकची सायकल चालकाला धडक लागली. यात सायकलचालक गंभीररीत्या जखमी झाला.

Tomato carpet on the road | रस्त्यावर टोमॅटोंचा सडा

रस्त्यावर टोमॅटोंचा सडा

Next
ठळक मुद्देठाणा येथील घटना : ट्रक उलटून दोन गंभीररीत्या जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : नागपूरहून भंडाराकडे जाणाºया ट्रक व मिनीडोर यांच्यात झालेल्या धडकेनंतर ट्रकची सायकल चालकाला धडक लागली. यात सायकलचालक गंभीररीत्या जखमी झाला. त्याला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारला सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा पेट्रोलपंप येथे घडली.
इस्तारी सुर्यभान आकरे (३८) रा.खरबी नाका असे जखमी इसमाचे नाव असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. नागपूरहून भंडाºयाच्या दिशेने भाजीपाला वाहून नेणारा मिनी ट्रक (क्र.एमएच ३६ एफ १९५८) ला मागेहून टमाटर वाहून नेणाºया ट्रक (क्र.एमएच ३६ एए ००६४) ने जोरदार धडक दिली. यात मिनीट्रकला तीन फुटापर्यंत फरफटत नेले. यात हा मिनीट्रक लोखंडी सुरक्षा कठळ्याला जावून लटकला. ट्रकही लोखंडी सुरक्षा रेलिंग तुडवित रस्त्याच्या खाली उतरला. दरम्यान सर्व्हिस रस्त्यावरून खरबीहून ठाण्याकडे जाणाºया सायकल चालकाला ट्रकने फरफटत नेले. यात सायकलचा चुराडा झाला. दरम्यान खोलगट भागात ट्रक उलटला. ट्रकचालकाला दर्शनी भागाचे काच फोडून बाहेर काढण्यात आले.
सायकल चालक इस्तारी आकरे यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून दोन्ही पाय निकामी झाल्याचे सांगितले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. तासाभरानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
माथनी पथकर कर्मचाºयांनी क्रेनच्या सहायाने मिनी ट्रक व ट्रकला बाजुला करीत रहदारी सुरळीत केली. ट्रकचालक भंडारा रूग्णालयात प्रथमोपचार करून रूग्णालयातून पळून गेला.
मिनीट्रकचा मालक चंद्रलाल चिचमलकर रा.सेंद्री यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिती आडे या करीत आहेत.
आजीच्या मयतीला जाण्यापूर्वीच घाला
इस्तारी आकरे यांच्या आजीचा वर्षभरापूर्वी अपघात झाला होता. यात आजीचे पाय निकामी झाले होते. आजीच्या निधनाची माहिती मिळताच ते सकाळी सायकलने अंत्यविधीकरीता निघाले. दरम्यान ठाणा पेट्रोलपंप उड्डाण पुलालगत सपाटे मंगल कार्यालयाजवळ त्यांचा अपघात होऊन दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे ते आजीच्या अंत्यसंस्काराला जाण्यापासून मुकले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाºया इस्तारी यांच्या पत्नीला आता दोन मुलांसह पतीचा सांभाळ करावा लागणार आहे.

Web Title: Tomato carpet on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.