आॅनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांची दमछाक
By Admin | Updated: June 21, 2015 00:51 IST2015-06-21T00:51:50+5:302015-06-21T00:51:50+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ...

आॅनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांची दमछाक
पोलिसांना बोलावले : तुमसरात कार्यकर्त्यांचा गदारोळ
तुमसर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तुमसर येथील कार्यालयात एकच गर्दी केली. दरम्यान, काल शुक्रवारला आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या कार्यालयाचे विद्युत पुरवठा बंद राहिल्याने उमेदवारी अर्ज अपलोड झाले नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी गदारोळ केला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया राबवित आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या संग्राम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अर्ज भरण्याचे काम त्यांनाच सोपविले आहे.
त्यानुसार येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारातील संग्रामच्या कार्यालयाची निवड केली. त्यामुळे उमेदवारांना माहिती हवी असल्यास तहसील कार्यालय ते पंचायत समिती असे सहा कि.मी. चे अंतर कापावे लागले. हा त्रास उमेदवारांना मारताना झाला. त्यामुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसत होता.
दि. १९ जून रोजी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता संग्राम कार्यालयासमोर उमेदवारांची रांगचरांग होती. दरम्यान या कार्यालयाचा विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाल्यामुळे उमेदवाराचे अर्ज भरणे झाले नाही. निवडणुकीत एका एकएका दिवसाला महत्त्व असताना आॅनलाईन प्रक्रियेमुळे अर्ज भरण्याकरिता २ ते ३ दिवस लागत असतील तर याचा उपयोग काय? असा उमेदवारांचा प्रश्न होता. (शहर प्रतिनिधी)