बाघ पाटबंधारे विभागाचा दुर्लक्षितपणा

By Admin | Updated: April 6, 2015 00:49 IST2015-04-06T00:49:42+5:302015-04-06T00:49:42+5:30

बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग आमगाव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे.

Tiger Irrigation Department's Ignorance | बाघ पाटबंधारे विभागाचा दुर्लक्षितपणा

बाघ पाटबंधारे विभागाचा दुर्लक्षितपणा

दुर्लक्ष : ४५ वर्षांपूर्वीच्या माल्ही, शंभुटोला वितरिकेची दुर्दशा
आमगाव : बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग आमगाव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे. याकरिता गावातील परिसरांना लागून वितरिका तयार केली मात्र ४५ वर्षापूर्वी तयार झालेल्या अनेक वितरिका आपली शेवटची घटका मोजत आहेत. यात माल्ही, शंभुटोला परिसरातील बाघपाटबंधारे विभागाची वितरिका विभागाच्या दुर्लक्षितपणाची शिकार ठरली आहे.
या वितरिकेच्या दुर्गतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात खरीप व रब्बी पाणी जात नाही, अश्ी बाघ पाटबंधारे विभागाची गंभीर अवस्था आहे.
तीन धरणाचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतो. त्यात शेतकरी डिमांड भरुन लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करतात. अनेक कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांना पाणी मिळण्याकरिता व व्यवस्थापनेसाठी कार्यरत आहेत. फक्त कार्यालयात खुर्च्या मोडने हा वेळापत्रक शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता व इतर कर्मचाऱ्यांचा आहे. मात्र चाळीस वर्षापूर्वी तयार झालेली माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेची दुर्गती बघितल्यानंतर शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. १९६९, ७० व ७१ या तीन वर्षात आमगाव, माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेचे काम करण्यात आले. हा तिन्ही गावाचा शेती परिसर जवळपास दोन हजार तिनश्े एकराचा आहे. त्यात वितरिकेचे पाणी दोन हजार शंभर एकरात रबी व खरीप पिकाकरिता पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला पुरविला जातो व दोनशे एकर शेती कोरडवाहू आहे.
प्रयत्न केला तर या शेतीला पाणी जाऊ शकतो, अशी पतिक्रिया पाणी बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या दोनशे एकरात उत्पन्न घेणारे शेतकरी अधिकारी यांना वजन देऊन आपले उत्पन्न घेतात. मात्र या वितरिकेवर पंधरा वर्षापूर्वी काम झाले पण ते थातूरमातूर करण्यात आले. उपसा केला जातो मात्र शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रकारे शेतीला पाणी मिळत नाही. लाखो रुपये पाणीपट्टी कराचे वसुल करुन शेतकऱ्यांना पाणी नाही. वितरिकेची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट काम नासधुस झाले आहेत. केव्हाही वितरिका ओलांडतानी धोका होऊ शकतो.
मात्र अधिकारी वितरिकेच्या कामासाठी पूर्णपणे उदासीन आहेत किंवा त्याचे लक्ष नाही. आज वितरिकेत पाणी नाही. मागीलवर्षी या परिसरात रबी लावली होती. पण तेथे पाण्याचा हाहाकार झाला हे विशेष. म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्याकरिता कवायत करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)

शेतकऱ्यांचा विचार करावा
रोटेशननुसार यावर्षी वितरिकेला रबी पाणी नाही, मात्र पाण्याची भिषणता लक्षात घेता आठवड्यातून एकदा तरी पाणी देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी माल्ही वितरिकेला पाणी जाऊ नये यासाठी वितरिकेत सिमेंट बांधकाम केल्याने एक थेंब पाणी येत नाही. एकंदरित आमगाव, माल्ही, शंभुटोलाला महारीटोला वितरिकेचे काम होणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Web Title: Tiger Irrigation Department's Ignorance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.