शक्तीप्रदर्शनानंतर थंडावल्या प्रचारतोफा
By Admin | Updated: October 31, 2015 01:42 IST2015-10-31T01:42:54+5:302015-10-31T01:42:54+5:30
ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून होणारा प्रचाराचा शहरातील कोलाहल थांबला आहे. तथापि, आजची रात्र उमेदवारांचे भाग्य बदलणारी आहे.

शक्तीप्रदर्शनानंतर थंडावल्या प्रचारतोफा
आजची रात्र वैऱ्याची : मोहाडी, लाखनी, लाखांदुरात रॅली, नगरपंचायतींची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेची
मोहाडी/लाखनी/लाखांदूर : ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून होणारा प्रचाराचा शहरातील कोलाहल थांबला आहे. तथापि, आजची रात्र उमेदवारांचे भाग्य बदलणारी आहे. व्यक्तीगत आमिषांचे पीक रात्रभर पेरून सुर्याेदयाची प्रतिक्षा उमेदवार करणार आहेत.
नगर पंचायतची निवडणूक राजकीय पक्षानी प्रतिष्ठेची बनवली आहे. नगर पंचायतच्या निकालावर पक्षांना बळ देणारं ठरणार आहे. बारा दिवस प्रचाराचा प्रवास आज सायंकाळी पाच वाजता संपला. दीड आठवडा चाललेला कलकला थांबला आहे. लक्षण लहान प्रभाग असताना सुद्धा प्रभागाशिवाय प्रचाराच्या गाड्या, टेम्पो फिरल्या. तरूण, तडफदार, झुंझार अशी अनेक विशेषणे लावून अपक्षांसह राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने एका मागे एक प्रचाराच्या गाड्या नगरात फिरत होत्या. उमेदवारही प्रभागात फिरत असल्याचे दिसून आले. आज सायंकाळी मोहाडीतील कोलाहल शांत झाला. बॅनर उतरले. अन् सुरू झाली कत्तलच्या रात्रीची योजना. सर्व उमेदवारांनी प्रचाराच्या दिवसात आपली क्षमता ओळखून घेतली. निवडूण येण्याचा अंदाजही बांधला. याच अंदाजावर रात्रीची योजना सुरू झाली. ३१ आॅक्टोबरची म्हणजे मतदानाच्या दिवशीची आदली रात्र उमेदवारांना बैचेन करून सोडणारी असते.
कोणत्याही क्षणी उमेदवार, उमेदवारांचा दूत येईल याची नेम नाही म्हणून मतदारही एककान सुरू ठेवतात. याचेही घ्यायचे, त्याचेही घ्यायचे असा रिवाज मतदारांनी पाडला आहे. धन संपत्तीच्या बळावर मतदान आज स्थितीत खरेदी केल्या जातो. तथापि, निर्णायक मतदान करणारे कमी असतात. कोणी माहौल वर मतदान करणारे, कुणी समाजाचा आहे म्हणून, तर कुणी अर्थकारणाला विकणारे मतदान करतात. काही काळासाठी मतदार पक्षही विसरतात. नेते स्वार्थासाठी पक्ष विसरू शकतात तर हा मतदार राजा आहे. कत्तल की रात मानली जाणारी ही रात्र उमेदवारांची शक्ती परीक्षा बघणारी असते. मोहाडीत कोणाची सत्ता बसणार याची अंदाज मतदारांनी आधीच बांधला आहे. पण, एका रात्रीत वातावरण पलटवणारी शक्ती मोठ्या संख्येने उमेदवार वापरणार असल्याने कोणाच्या पक्षाचा आलेख उतार चढाव होईल याचा अंदाज प्रत्यक्ष रूपाने मतमोजणीच्या दिवशीच दिसून येईल.
लाखनी : लाखनी नगरपंचायत निवडणुकीत ७३ उमेदवारांच्या प्रचारतोफा आज सायंकाळी थंडावल्या. दिवसभर पदयात्रा, रॅली, घोषणा यामुळे लाखनी शहर दुमदुमले. राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपाच नेते लाखनी शहरात दिवसभर फिरले आज सकाळी ९ वाजता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी प्रभाग १६, १७ मध्ये पदयात्रा केली. आ. बाळा काशिवार यांनी प्रत्येक प्रभागातील गल्लीत जावून मतदारांशी संपर्क केला.
काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिरलोरकर यांनी प्रत्येक वॉर्डात जावून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. विकास गभणे, अशोक चोले यांनी रॅली काढून मतदान करण्याचे आवाहन केले. नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १७ प्रभागात १७ मतदान केंद्रासाठी २० पथक तयार झाली आहेत. लाखनी शहरात १०२९४ मतदार मतदान करणार आहेत. त्यात पुरूष मतदार ५१३१ व स्त्री मतदार ५१६३ आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपले कौशल्य पणाला लावले आहे. आज व उद्याची रात्र उमेदवारासाठी वैऱ्याची आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांना खुश करित आहे. एका उमेदवाराने मतदारांकडे तेलाचे पिपे पाठविले एका उमेदवाराने महिलांना खड्यांचे वाटप केल्याची चर्चा आहे. महिला मतदारांना खुष करण्यासाठी साड्या वाटण्यात आल्याची चर्चा आहे. काही उमेदवारांनी कोजागिरी साजरी करून मतदारांना दुध केवळ वाटले. पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर असून प्रति हेक्टर हजाराच्यावर रेट सुरू असल्याची चर्चा आहे. मतदार राजाला विकत कसे घेता येईल व आपल्याला खुर्ची कशी मिळेल, याकडे उमेदवारांचे लक्ष आहे.
लाखांदूर : नगर पंचायतीच्या निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्प्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपंचायत क्षेत्रात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उम्मीदवारांनी मतदारांसी थेट संपर्क साधून आशिर्वाद घेतला. अन्य राजकीय पक्षांनीही असाच प्रकार केला.
बँक आॅफ इंडिया शाखेच्या समोरून दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँगे्रसने रॅली काढण्यात आली. रॅली जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगर, अविनाश ब्राम्हणकर, बाळु चुन्ने, अॅड. मोहन राऊत, प्रियंक बोरकर, नरेश दिवढे, डॉ. भारती, निलेश बघमारे, देवानंद नागदेवे, रवि धोटे, शैलेश चौव्हाण, चक्रधर तोंडरे यांचे नेतृत्वात काढण्यात आली. उम्मीदवारांनी घरो घरी जावून मतदारांसी संवाद साधून आशिर्वाद प्राप्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लाखनी, मोहाडी व लाखांदूर या तीनही नगर पंचायतीच्या सर्व प्रभागात निवडणुक लढवीत आहे. उम्मीदवारांनी दारा दारावर पोहचुण मतदारांचा आशिर्वाद ही घेतला. या रॅलीला ही मतदारांनी स्वयंउत्सफुर्त पणे प्रतिसाद दिला. (तालुका प्रतिनिधी)