तीन दरोडेखोर गजाआड

By Admin | Updated: June 3, 2014 23:50 IST2014-06-03T23:50:44+5:302014-06-03T23:50:44+5:30

भरदिवसा दरोडेखोरांनी एका इसमाला मारहाण करून लुटले. याची माहिती कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे अनेक दिवसांपासून लोकांना लुटणारे दरोडेखोर गवसले.

Three robber left behind | तीन दरोडेखोर गजाआड

तीन दरोडेखोर गजाआड

पोलिसांची सतर्कता : सिनेस्टाईल पाठलाग, तिघांनाही नागपूर दवाखान्यात हलविले
वरठी  : भरदिवसा दरोडेखोरांनी एका इसमाला मारहाण करून लुटले. याची माहिती कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे अनेक दिवसांपासून लोकांना लुटणारे दरोडेखोर गवसले. यात एकनाथ देशभ्रतार (२५), सोनू गजभिये (२५) रा.कामठी व अविनाश काळे रा.नागपूर यांच्यावर भादंवि ३९२ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  तीनही दरोडेखोर जखमी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. दरोडेखोर हे कामठी व नागपूर येथील रहिवासी असल्याचे समजते.
भ्रमणध्वनीवर मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी आपली दुचाकी त्या दिशेने वळविली. योगायोगाने तीन युवक दुचाकीने पळताना दिसले. त्यांना हटकण्यात आले. पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी बेभान वेगाने दुचाकी हाणली. कुठलीही पर्वा न करता पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिसांना चकमा देण्यासाठी सुसाट धावणारी चोरांची दुचाकी झाडावर आदळली व ते पडले. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांपासून सुटका करण्यासाठी त्यांनी ऑटो रिक्शा गाठले. पण ते सुटका करू शकले नाही. समोरून येणार्‍या पोलिसांना ते दिसले व त्यांना अखेर जेरबंद व्हावे लागले.
ही चित्रपटातील कथानकाला शोभणारी घटना काल दुपारी खुश्रीपार सातोना या मार्गावर घडली. खुश्रीपार सातोना रस्त्यावरून नेरीचे मधुकर मते हे स्वगावी जात होते. दरम्यान भंडारा पासून पाठलाग करीत तीन युवकांनी त्यांच्या दुचाकीजवळ येऊन अंगावर थुंकले. यावेळी मधुकर मते यांनी गाडी थांबविली. याचा फायदा घेऊन त्यांनी त्याला अडविले. त्यांच्या खिशातील बँकेची पुस्तक व वरच्या खिशातील एक हजार रुपये जबरन हिसकाविले. याला विरोध करत असताना दरोडेखोरांनी त्यांना मारहाण केली व मते यांच्या दुचाकीची चाबी घेऊन खात मार्गाने पसार झाले.
गत काही महिन्यांपासून भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गावात दरोडेखोरांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक भंडारा यांनी या भागात वरठी आऊटपोस्टचे पोलीस हवालदार विजय पंचबुद्धे व महादेव वंजारी यांची ड्युटी लावली आहे.
घटनेच्या दिवशी मधुकर मते यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार भ्रमणध्वनीने गावात सांगीतला. वेळ न गमवता एका इसमाने हवालदार महादेव वंजारी यांच्या भ्रमणध्वनीवर माहिती दिली. भ्रमणध्वनीवर माहिती मिळताच विजय पंचबुद्धे व महादेव वंजारी यांनी दरोडेखोरांच्या दिशेने मोर्चा वळविला. दरम्यान, त्यांना सी.बी.झेड. एम.एच. ४0 जे १७२२ या सी.बी.झेड. नावाच्या दुचाकीवर तीन युवक जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले व अडविण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला.
सुसाट वेगाने पळून जाण्याच्या नादात त्यांची दुचाकी झाडावर आदळली व ते जखमी झाले. त्या अवस्थेत त्यांनी रस्त्यावरून जाणार्‍या ऑटोरिक्षाला अडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, समोरून येणार्‍या पोलिसांनी त्यांना पकडले. तपास पोलीस निरीक्षक राखडे व सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभणे करीत आहेत. (वार्ताहर)
 

Web Title: Three robber left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.