भंडाराजवळ अपघातात एकाच परिवारातील तीन जण जखमी, तीन वाहने एकमेकांवर आदळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 22:57 IST2019-04-02T22:56:50+5:302019-04-02T22:57:13+5:30
राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तीन जण गंभीर जखमी झाले.

भंडाराजवळ अपघातात एकाच परिवारातील तीन जण जखमी, तीन वाहने एकमेकांवर आदळली
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात भंडाराजवळील बेला गावाजवळ मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडला. भंडारा येथील विलास सुरेश बडवाईक आपल्या परिवारासह नागपूरवरून कारने येत होते. बेला गावाजवळ रात्री १० वाजता त्यांच्या मारुती कारला समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने धडक दिली. त्याचवेळी स्विफ्ट डिझायर कार मागून येऊन धडकली. या अपघातात विलास बडवाईक यांची पत्नी, मुलगा आणि आई जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.