गुन्हेगारी प्रवृत्तीचे तीन जण सहा महिन्यांसाठी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST2021-03-20T04:35:20+5:302021-03-20T04:35:20+5:30

दिलीप सुरेश देशमुख रा. शुक्रवारी, जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग ताेमर रा. काझीनगर आणि विक्की उर्फ गाेविंद व्यास सहानी रा. ...

Three people with criminal tendencies were deported for six months | गुन्हेगारी प्रवृत्तीचे तीन जण सहा महिन्यांसाठी तडीपार

गुन्हेगारी प्रवृत्तीचे तीन जण सहा महिन्यांसाठी तडीपार

दिलीप सुरेश देशमुख रा. शुक्रवारी, जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग ताेमर रा. काझीनगर आणि विक्की उर्फ गाेविंद व्यास सहानी रा. ममता नगर खात राेड भंडारा अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध भंडारा पाेलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या तिघांना तडीपार करण्यासंदर्भात प्रस्ताव भंडारा पाेलिसांनी तयार करुन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला हाेता. या प्रस्तावाची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी या तिघांना सहा महिन्यासाठी भंडारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पारित केले. या तिघांना भंडारा पाेलिसांनी नाेटीस बजावली असून आपले बस्थान इतरत्र हलविण्याची सुचना दिली आहे.

भंडाराचे ठाणेदार लाेकेश कानसे यांच्या मार्गदर्शनात हा प्रस्ताव सादर करण्यात आला. यापुढेही तडीपारी संदर्भात प्रस्ताव तयार केले जाणार असल्याची माहिती ठाेणदार कानसे यांनी दिली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या काेणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे पाेलिसांनी सांगितले. या तिघांच्या तडीपारीने गुन्हेगारी संबंधित व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Three people with criminal tendencies were deported for six months