समिती यार्डात हजारो धान पोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:28+5:30

धानाचे कोठार म्हणून तुमसरची ओळख राज्यात आहे. येथील बाजार समिती प्रसिद्ध मंडी म्हणून सुपरिचीत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात उघड्यावर धानाची पोती पडून आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसण्याची शक्यता अधिक आहे. पाऊस बरसला तर संपूर्ण धानाची पोती ओलीचिंब होण्याची अधिक शक्यता आहे.

Thousands of paddy sacks opened in the committee yard | समिती यार्डात हजारो धान पोती उघड्यावर

समिती यार्डात हजारो धान पोती उघड्यावर

Next
ठळक मुद्देपावसाचा फटका बसण्याची शक्यता : सुविधा पुरविण्याकडे समितीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : महाराष्ट्रात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती धानाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बाजार समितीच्या यार्डवर मोठ्या प्रमाणात धान विक्रीला आले आहे. परंतु ते उघड्यावर ठेवण्यात आले आहे. वादळी पाऊस आल्यावर धानाचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून शुक्रवारी सकाळी तुमसर शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
धानाचे कोठार म्हणून तुमसरची ओळख राज्यात आहे. येथील बाजार समिती प्रसिद्ध मंडी म्हणून सुपरिचीत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात उघड्यावर धानाची पोती पडून आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसण्याची शक्यता अधिक आहे. पाऊस बरसला तर संपूर्ण धानाची पोती ओलीचिंब होण्याची अधिक शक्यता आहे.
येथील बाजार समिती श्रीमंत आहे.
किमान खुले मार्केट यार्ड आच्छादनाची येथे गरज आहे. शेतकरी तथा व्यापाऱ्यांचे धान्याची सुरक्षितता करणे ही बाजार समिती संचालक मंडळाची जबाबदारी आहे. केवळ बांधकाम करणे हाच एकमेव काम येथे सुरू आहे. धान्य सुरक्षित ठेवण्याकरिता शेड तयार करण्याची येथे खरी गरज आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हे शेतकरी असून शेतकऱ्यांच्या धान्याची काळजी येथे संचालक मंडळाने प्राधान्याने करण्याची गरज आहे.

Web Title: Thousands of paddy sacks opened in the committee yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.