चकारा येथे हजारो दमा रुग्णांनी घेतला वनौषधीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:14 AM2017-10-07T00:14:23+5:302017-10-07T00:15:00+5:30

अ‍ॅलोपॅथीच्या युगात आयुर्वेदिक गुणकारी व त्यातही महत्वाचे म्हणजे मोफत औषधी अड्याळ व परिसरातील दमा रुग्णांना मिळावे म्हणून चकारा महादेव देवस्थान व अड्याळ हनुमान देवस्थानचे ....

 Thousands of asthma patients took advantage of herbal remedies at Chandara | चकारा येथे हजारो दमा रुग्णांनी घेतला वनौषधीचा लाभ

चकारा येथे हजारो दमा रुग्णांनी घेतला वनौषधीचा लाभ

Next

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अ‍ॅलोपॅथीच्या युगात आयुर्वेदिक गुणकारी व त्यातही महत्वाचे म्हणजे मोफत औषधी अड्याळ व परिसरातील दमा रुग्णांना मिळावे म्हणून चकारा महादेव देवस्थान व अड्याळ हनुमान देवस्थानचे पदाधिकाºयांनी समाजसेवेचा छंद कायम ठेवला आहे. दमा रूग्णांना या गुणकारी वनऔषधीचा लाभ सर्वांना मोफत मिळावा यासाठी २०११ ला शरद पौर्णिमेच्या पर्वावर समाजसेवी कार्याला मंदिरात सुरुवात केली आणि दरवर्षी बाहेरील दमा रूग्ण येथे या दिवशी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. दरवर्षी दोन ते तीनदा या गुणकारी औषधीचे प्राशन करणारे दमा रोग मुक्त झाल्यामुळे येथे येणारी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे देवस्थान पंच कमेटीने यावर्षी मंदिर परिसरातील शाळेत या सामाजिक उपक्रम राबविला. शरद पौर्णिमेच्या म्हणजे कोजागिरीच्या दिवशी शास्त्रोक्त पध्दत, मंत्रोच्चारण आणि गुणकारी वनऔषध या तिघांचा संगम पाहुण ईथे येणारा प्रत्येक जण येथील जागृत मारुतीरायाला वंदन करुन जातो. या औषधीची दिग्ग्जांनी विचारपुस करून या औषधीचा लाभही घेतला. यावर्षी ही औषध घ्यायला ईथे दोनवर्षापासुन अमेरिकेला राहणारा महाराष्टÑीयन येतो म्हणून माहित पडले. त्यांनी ही गुणकारी औषधीचा लाभ मिळाला असुन त्यामुळे अमेरीकेला रवाणगी दरवर्षाला नेत असल्याचे त्यांनी सांगितले. या सामाजिक कार्याला दरवर्षी पंचकमेटी सोबतच अड्याळ ग्रामस्थांचे सुध्दा सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. त्यामुळे इथे येणारे बाहेरचे मंडळी मोफत मिळणाºया सेवेला पाहुन धन्य होतात.

Web Title:  Thousands of asthma patients took advantage of herbal remedies at Chandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.