‘त्या’ गावांना मिळाला महसुली गावाचा दर्जा

By Admin | Updated: January 12, 2016 00:34 IST2016-01-12T00:34:15+5:302016-01-12T00:34:15+5:30

प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करून ज्या गावात वास्तव्य करण्यात येत असते,...

'Those' villages got the revenue village status | ‘त्या’ गावांना मिळाला महसुली गावाचा दर्जा

‘त्या’ गावांना मिळाला महसुली गावाचा दर्जा

भंडारा, पवनी तालुक्याचा समावेश : मागीलवर्षी १६ गावांचा समावेश
भंडारा : प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करून ज्या गावात वास्तव्य करण्यात येत असते, त्या गावांना शासनाच्या राजपत्राप्रमाणे जिल्हाप्रशासन महसुल गाव म्हणून घोषित करते. चालु वित्तीय वर्षात जिल्हा प्रशासनाने पवनी येथील चिचखेडा (पुनर्वसन) तथा भंडारा तालुक्यातील मौदी (पुनर्वसन) या दोन गावांना महसुल गावाचा दर्जा प्रदान केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी १६ गावांना महसुली गावांचा दर्जा देण्यात आला होता.
विदर्भातील महत्वाकांक्षी तथा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळालेल्या गोसीखुर्द धरणांतर्गत प्रकल्पबाधितांना पुनर्वसनाअंतर्गत नियोजित स्थळी स्थायी करण्याचे उदिष्ठ टप्प्यानुसार होत आहे. या अंतर्गत पवनी तालुक्यातील चिचखेडा या गावाचे पुनर्वसन कोसमतोंडी गावसिमेत करण्यात आले आहे.
या गावाला आला चिखेडा पुनर्वसन म्हणून ओळखण्यात येणार आहे. त्याचप्रकारे भंडारा तालुक्यातील मौदी या गावाचे पुनर्वसन पहेला गावसिमेत करण्यात आले आहे. या गावाची ओळख आता मौदी पुनर्वसन म्हणून ओळखण्यात येणार आहे.
महसुल गावाचा दर्जा मिळाल्यामुळे अन्य गावांना मिळणाऱ्या नागरी सुविधा या गावातील नागरिकांना मिळणार असल्याचे राजपत्रात नमुद केले आहे. (प्रतिनिधी)

चिचखेडा आणि मौदी या दोन्ही गावांच्या महसूल दर्जाबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी मंजुरी प्रदान केली आहे. त्या दिशेने महसुल यंत्रणेचे काम सुरू आहे. प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- सुजाता गंधे,
उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा.

Web Title: 'Those' villages got the revenue village status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.