लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेच्यावतीने आमदार डॉ. परिणय फुके आमदार भंडारा -गोंदिया विधान परिषद यांना निवेदन देऊन नागपूर येथे करचखेडा सिंंचन प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. संपूर्ण माहिती घेण्याकरिता डॉ. परिणय फुके यांनी भंडारा जिल्ह्याचे जलसंपदा विशेष कार्यकारी अभियंता मेंढे यांना सुध्दा बोलाविले होत. जेणे करून संपूर्ण महिती मिळेल. चर्चामध्ये लाखनी महामार्गच्या उत्तरेला मौजा सोमलवाडा, मेंढा, रेन्गेपार, चीकला बोडी, दैत्यमण्ग्ली, खेडेपार, गोंडसावरी, परसोडी, केसलवाडा, खुर्शिपार, सालेभाटा, मासलमेटा, बोरगाव, आलेसूर, लाखोरी, राजेगाव, मोरगाव, सिंदीपार, मुडीपार, किन्ही, एकोडी, गडेगाव यासारखे सर्व मिळून एकूण ४९ गावे येतात व ८९०० हेक्टर जमिनीच्या सिंचना करीता एकंदरीत खर्च ६०० - ७०० कोटी आहे.या गावांना वैनगंगेचे पाणी लिफ्टद्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी देण्याकरिता करचखेडा सिंचन प्रकल्प (धारगाव टप्पा टू ) चे पाणी देण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्याप्रमाणे साकोली येथे कृषी मेळाव्यात डॉ. फूके आमच्या संघटनेला शब्द दिला होता त्या प्रमाणे त्यांनी स्वत: संपर्क साधून एकदा नव्हे तर पांचवेळा त्यांनी सम्पर्क साधून आम्हा शेतकºयांना चर्चेकरिता बोलाविले व सविस्तर चर्चा करून मी आता कामाला लागतो असे ठाम पणे सांगितले. संघटनेने जो सिंचना मुद्दा मागच्या वर्षापासून उचललेला होता. तो आता कुठे तरी डॉ फूके यांच्या सहकार्याने मार्गी लागेल अशी भावना जण सामन्याच्या मनात रुजत आहे. डॉ. फूके आम्हा शेतकºयांचा वर्षानूवर्षे रेंगाळत असलेला हा सिंचनाचा प्रश्न आता तरी सुटेल अशी आश्या पल्लवित झाल्या आहेत .आमदार डॉ फूके यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनचे अध्यक्ष मनोज पटले, सचिव सुधाकर हटवार, संघटक सुरेश बोपचे, संजय रामटेके, धनंजय लौहबरे, धनपाल बोपचे, प्रभाकर पटले, दीपक कड्गाये, विलाश पटले, विजय रीनाइत, खुमेष बोपचे, संजू बोपचे, संजय रहणगडाले, मुलचंद रहांगडाले, तेजलाल पटले इत्यादी उपस्थित होते.
‘त्या’ ४९ गावांतील सिंचनाचा प्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:44 IST
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेच्यावतीने आमदार डॉ. परिणय फुके आमदार भंडारा -गोंदिया विधान परिषद यांना निवेदन देऊन नागपूर येथे करचखेडा सिंंचन प्रकल्पावर चर्चा करण्यात आली.
‘त्या’ ४९ गावांतील सिंचनाचा प्रश्न सुटणार
ठळक मुद्देपरिणय फुके यांना निवेदन : शेतकरी-शेतमजूर संघटनेचा पुढाकार