तिसरा रेल्वे ट्रॅक २०२२पर्यंत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:51 IST2019-04-20T00:50:14+5:302019-04-20T00:51:56+5:30
हावडा-मुंंबई मार्गावर तिसरी रेल्वे ट्रॅकची कामे जोरात सुरू आहे. हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आला आहे. राजनांदगाव ते कळमना दरम्यान पूलांचे व रेल्वे ट्रॅकचा टप्प्याची कामे प्रगतीपथावर असून सदर रेल्वे मार्ग २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे.

तिसरा रेल्वे ट्रॅक २०२२पर्यंत पूर्ण होणार
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : हावडा-मुंंबई मार्गावर तिसरी रेल्वे ट्रॅकची कामे जोरात सुरू आहे. हावडा ते राजनांदगावपर्यंतच्या रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आला आहे. राजनांदगाव ते कळमना दरम्यान पूलांचे व रेल्वे ट्रॅकचा टप्प्याची कामे प्रगतीपथावर असून सदर रेल्वे मार्ग २०२२ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. देशातील ब्रिटीशकालीन मुंबई-हावडा असा हा रेल्वेमार्ग असून पूर्वी तो एकेरी होता. त्यानंतर दुहेरी व सध्या तिहेरी रेल्वे मार्गाचे बांधकाम केले जात आहे.
मुंबई-हावडा हा देशातील प्रमुख व प्रथम रेल्वे मार्ग आहे. देशांतर्गत मालवाहतुकीकरीता ब्रिटीशांनी सर्वप्रथम हा रेल्वे मार्ग तयार केला. रेल्वे मार्गाला भारतात लाईफ लाईन असेही संबोधतात. ब्रिटीशांनी एकेरी रेल्वे ट्रॅक तयार केला होता. भारतीयांनी तो दूहेरी केला व तब्बल पन्नास वर्षानी मुंबई-हावडा रेल्वे मार्ग तिहेरी होत आहे.
हावडा-नागपूर-मुंबई दरम्यान मालवाहतूक गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून दूहेरी रेल्वे ट्रॅकवरील प्रवाशी रेल्वेगाड्यांना त्यामुळे मोठा फटका बसतो मालवाहतूक गाड्या विना थांबा तिसऱ्या ट्रॅकवरून धावणार असल्याची माहिती आहे. देशांतर्गत स्वस्त मालवाहतुकीकरीता रेल्वेला उद्योगती प्रथम पसंती देतात. केंद्र शासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल यातून प्राप्त होणार आहे.
प्रवाशी गाड्यांची संख्या वाढणार
तिसºया रेल्वे ट्रॅकमुळे मालवाहतूक गाड्यांना स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालय या मार्गावर प्रवाशी रेल्वेगाड्या वाढविणार आहे. छत्तीसगड, ओरीसा, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यात थेट मालांची ने-आण तथा प्रवाशांना मोठी सेवा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे समजते.
नागपूर-बिलासपूर शटल ट्रेन
तिसºया रेल्वे ट्रॅक उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकार नागपूर-बिलासपूर अशी शटल ट्रेन सुरू करणार असल्याचे समजते. प्रथम टप्प्यात नागपूर-गोंदिया, रायपूर, बिलासपूर असा हा प्रवास राहणार आहे. याकरिता इतर खर्च येणार नाही. प्रवाशांना सोयीचे व महाराष्ट्र छत्तीसगड अशी कनेक्टव्हीटी येथे वाढणार आहे. पुढील काळात भारतीय रेल्वे हायटेक होणार असून महसूल वाढ हा त्यामागील एक हेतू असल्याचे समजते.