चोरट्यांनी आधी चाक व नंतर दुचाकीच लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:10+5:302021-09-13T04:34:10+5:30

अडयाळ : अडयाळ पोलीस ठाणे हद्दीत केसलापुरी ते भिवखीडकी रोपवन वाटिकेच्या मार्गावर पोळ्याच्या दिवशी सायंकाळी दोन दुचाकी वाहनांचा अपघात ...

The thieves removed the wheel first and then the two-wheeler | चोरट्यांनी आधी चाक व नंतर दुचाकीच लांबविली

चोरट्यांनी आधी चाक व नंतर दुचाकीच लांबविली

अडयाळ : अडयाळ पोलीस ठाणे हद्दीत केसलापुरी ते भिवखीडकी रोपवन वाटिकेच्या मार्गावर पोळ्याच्या दिवशी सायंकाळी दोन दुचाकी वाहनांचा अपघात झाला. यात एकाला जबर दुखापत होऊन त्याला आधी अडयाळ ग्रामीण रुग्णालयात व तेथून भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आजही तिथेच उपचार सुरू आहे.

घटनेच्या वेळी जबर जखमी अवस्थेत असलेल्या आनंद वालदे रा. बाजारपेठ अडयाळ याला ग्रामस्थ व नातलगांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याचे दुचाकी वाहन घटनास्थळी पडली होती. पण, दुसऱ्या दिवशी त्या वाहनाचे पुढील चाक काढून नेले होते आणि तिसऱ्या दिवशी रात्रीपासून वाहन बेपत्ता आहे.

अडयाळ पोलीस ठाणे हद्दीत आजपर्यंत अनेक अपघात झालेत. अपघात ग्रस्त वाहनांच्या सामानाची अनेकदा चोरीही झाली. यात काही शंका नाही, पण पूर्ण गाडीच अपघात स्थळावरून लंपास होण्याची ही पहिलीच घटना आहे. यावर येथील पोलीस प्रशासन शोध घेणार की नाही हाही एक प्रश्नच आहे. अडयाळ पोलिसांनी दुसरी दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली; पण जी दुचाकी घटनास्थळी होती, ती मात्र अद्याप पोलिसांना गवसली नाही.

Web Title: The thieves removed the wheel first and then the two-wheeler