‘त्यांना’ करावा लागतो पायदळ प्रवास
By Admin | Updated: September 10, 2014 23:26 IST2014-09-10T23:26:10+5:302014-09-10T23:26:10+5:30
गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.

‘त्यांना’ करावा लागतो पायदळ प्रवास
एकोडी : गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.
साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे एक गाव असून हे गाव भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. येथील भरताचे मोठे वांगे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून येथे मिरचीचे उत्पादन जास्त होत असल्याने या गावाला मिरची किन्ही सुद्धा म्हणतात.
या गावातून एसटीची सोय नसल्याने येथील जनतेला प्रवाशांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना पायी पैदल किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावात भाजीपाल्याचे उत्पादन जास्त होत असले तरी बाजारपेठेपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी वर्गाला सुद्धा खाजगी वाहन वापरावे लागते.
साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे गाव दोन तालुक्याच्या सिमेवर असून लाखनी व साकोली तालुक्याला जोडणारे गाव आहे. जवळपास ८ ते १० वर्षापुर्वी या गावावरून बस सेवा सुरू होती. ती बस लाखनी वरून सालेभाटा मोरगाव किन्ही वरून येवून एकोडी येथे हालटींग करायची व सकाळी त्याच मार्गे पुन्हा लाखनीला परत जायची. या बसमुळे परिसरातील जनतेला प्रवाशांची सोय उपलब्ध झाली होती व एसटी विभागाला त्याचा आर्थिक फायदा पण झाला होता. लाखनी सालेभाटा मोरगाव किन्ही हा संपूर्ण डांबरीकरणाचा मार्ग आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून ही बससेवा बंद झाली असून ती आताही बंदच आहे. किन्ही येथून जवळपास एक कि़मी. अंतरावरील दाजीबा नगर पर्यंत साकोली डेपोची बस जाते. ही बस निलागोंदी मार्गे दाजीबा नगर वरून मोरगाव सालेभाटा मार्गे लाखनीला जाते व त्याच मार्गे परत जाते. ही बस सुद्धा किन्ही गावावरून जात नसल्याने जनतेला प्रवासाचा मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाल आहे. (वार्ताहर)