अनधिकृत धार्मिक स्थळे होणार भुईसपाट

By Admin | Updated: February 13, 2016 00:20 IST2016-02-13T00:20:57+5:302016-02-13T00:20:57+5:30

काही धार्मिक स्थळे नियमानुसार नियमित करण्यात येणार असून इतर अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

There will be unauthorized religious places | अनधिकृत धार्मिक स्थळे होणार भुईसपाट

अनधिकृत धार्मिक स्थळे होणार भुईसपाट

शासनाचे निर्देश : तुमसर व मोहाडी तालुक्यात होणार कारवाई
तुमसर : काही धार्मिक स्थळे नियमानुसार नियमित करण्यात येणार असून इतर अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तुमसर व मोहाडी तालुकयातील अनधिकृत धार्मिक स्थळे भूईसपाट करणे व काही धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात नुकतीच तुमसर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
अनियमित धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात येणार असून नियमानुसार असलेले धार्मिक स्थळे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तुमसर शहरात २५ तर तालुक्यात १७ धार्मिक स्थळे आहेत. मोहाडी शहरात ९ तर तालुक्यात २० धार्मिक स्थळे आहेत. यापैकी काही धार्मिक स्थळे अनधिकृत आहेत. ही अनधिकृत धार्मिक स्थळे भुईसपाट करण्यात येणार आहे. यासंदर्भात तुमसर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नुकतीच उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी तुमसर व मोहाडी येथील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महसूल, पोलीस, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या धार्मिक स्थळांची संपूर्ण माहिती घेण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नियमित व नियमानुसार कोणते धार्मिक स्थळ आहे. अनियमित तथा अनधिकृत धार्मिक स्थळ कोणते याची यादी तयार केल्यानंतर लोक सहभागातून अनधिकृत धार्मिक स्थळ भुईसपाट करण्यात येणार आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातही चाचपणी घेण्यात येणार आहे. अनाधिकृत धार्मिक स्थळांबाबत अवर्त कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (तालुका प्रतिनिधी)

शासनाच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याचा तथा नियमित धार्मिक स्थळांना कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे. यासंदर्भात तुमसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
- शिल्पा सोनाले,
उपविभागीय अधिकारी, तुमसर

Web Title: There will be unauthorized religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.